Vijai Sardesai: गोव्‍याला न्याय देण्यासाठी स्‍वतंत्र 'आयएएस केडर'ची गरज! सरदेसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Independent IAS Cadre for Goa: अधिकाऱ्यांना गोव्‍याची संस्‍कृती आणि इतर व्‍यवहाराबद्दल काहीच ज्ञान नसल्‍याने ते गाेव्‍याला आवश्‍‍यक तो न्‍याय देऊ शकत नाहीत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Vijai Sardesai Demands Seperate IAS cadre

मडगाव: सध्‍या गोवा ॲग्‍मूट केडरखाली येत असल्‍याने अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि इतर केंद्रशासित प्रदेश मधून केंद्रीय सेवा अधिकारी या केडरमधून गोव्‍यात पाठविले जातात. मात्र या अधिकाऱ्यांना गोव्‍याची संस्‍कृती आणि इतर व्‍यवहाराबद्दल काहीच ज्ञान नसल्‍याने ते गाेव्‍याला आवश्‍‍यक तो न्‍याय देऊ शकत नाहीत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

यासाठी गोव्‍यासाठी स्‍वतंत्र आयएएस केडर स्‍थापन करावा, अशी मागणी मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहून केली आहे. मुख्‍यमंत्र्यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे संपर्क साधून हे बदल घडवून आणावेत, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

ॲग्‍मूट हा वेगवेगळ्या प्रदेशातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेला केडर असल्‍याने या केडरचे अधिकारी त्यांच्या वैविध्यपूर्ण पोस्टिंगमधून जे वैविध्य आणि अनुभव आणतात त्याची आम्ही प्रशंसा करतो, परंतु अद्वितीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या राज्याच्या विपूल संधींचा पाठपुरावा करण्यासाठी गोव्याला स्वतःचे स्वतंत्र अधिकारी केडर असण्याची निर्विवाद गरज आहे, असे सरदेसाई म्‍हणाले.

गोव्याची भाषा, संस्कृती, वारसा आणि कायदेशीर चौकट यासंदर्भात एक वेगळी ओळख आहे, हे सर्व प्रतिसादात्मक, कार्यक्षम प्रशासनाच्या कार्यासाठी अविभाज्य आहेत. तथापि, देशाच्या इतर भागांतून गोव्यात नियुक्त अधिकाऱ्यांना या बाबींची माहिती नसते, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

Vijai Sardesai
Goa Drugs Case: खळबळजनक! गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा दावा

‘ते’ अधिकारी लोकांपासून दूरच

काही अधिकारी जनता आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी या दोघांबद्दल अहंकार आणि अनादर दाखवतात. तसेच लोकांपासून स्वतःला दूर ठेवतात. तर काहीजण दिल्लीतील त्यांच्या कारकीर्दीवर परिणाम होणार या भीतीने, सत्ताधाऱ्यांना नाराज न करणारे निर्णय घेत सामान्‍यांवर अन्‍याय करतात. त्‍यामुळे गोव्‍यासाठी स्‍वतंत्र आएएस, आयपीएस आणि आयएफएस केडर असणे आवश्‍‍यक आहे, असे सरदेसाई म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com