Vijay Sardesai Dainik gomantak
गोवा

Vijai Sardesai : आवाजाने ध्वनी प्रदुषण होते तर कोळसा हाताळणीने वायू प्रदूषण होत नाही का?

पर्यावरण कायद्याची दखल घेत कोळसा हाताळणी बंद करा

दैनिक गोमंतक

मडगाव : पर्यावरण रक्षण कायद्याचा आधार घेत ध्वनी प्रदूषण अडविण्यासाठी पोलीस रात्री 10 नंतर संगीत वाजविण्यास बंदी आणतात तर त्याच न्यायाने वायू प्रदूषण करणारी मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी का बंद करत नाहीत असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

(MLA Vijay Sardesai said why stop coal handling in Murgaon port which violates environment law)

उच्च न्यायालयाचा आदेशाचा फायदा घेत साध्या पोलीस रात्री 10 नंतर लोकांची लग्ने बंद करू लागले आहेत. रात्री 10 नंतर संगीताचा वापर केला तर ध्वनी प्रदूषण वाढते मात्र वास्को परीसरात कोळशाच्या हाताळणीमुळे सकाळच्या वेळेत वायू प्रदूषण उच्चांक गाठत असून तिथे सरकार कोणावरही कारवाई का करत नाही? असा सवाल सरदेसाई यांनी केला.

वास्तविक उत्तर गोव्यात काही हॉटेल चालक पोलिसांशी हातमिळवणी करून रात्रभर गोंगाट करत होते. त्यांना आळा बसावा म्हणून स्थानिक न्यायालयात गेले. तो गोंधळ अजूनही तसाच चालू आहे. पोलीस त्यांच्यावर काहीच करवाई करत नाहीत उलट लग्ने आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद करू लागले आहेत असा आरोप यावेळी सरदेसाई यांनी केला.

वास्तविक गोव्यातील ख्रिस्ती लग्ने, धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रम याना या बांदितून वगळण्याची गरज होती. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात आली होती त्यावेळी सरकारी वकिलांनी हा मुद्दा न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे होता. मात्र सध्या हे सरकार आपलेच इव्हेंट करण्यात मग्न आहे त्यांना या सामाजिक इव्हेंटचे काहीच पडून गेलेले नाही हे ह्यावरून सिद्ध होते असा आरोप त्यांनी केला.

आपण जेव्हां एनडीएचा घटक होतो, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात ही गोष्ट आणून देऊन गोव्यात जी 18 दिवसांसाठी आवाज प्रदूषण बंदी कायदा शिथील करण्यात आला आहे. ही शिथिलता 118 दिवसासाठी करावी अशी मागणी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी त्याला सहमती दर्शविली होती. त्याला आता चार वर्षे उलटून गेली. ह्या सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून ही शिथिलता मर्यादा वाढवून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT