Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: गोव्याचे युवक बेरोजगार होत असताना मुख्यमंत्री 'इव्हेंट' करण्यात बिझी...

ऐन पर्यटन हंगामात बेरोजगारीत वाढ, राष्ट्रीय सरासरीपेक्षा बेरोजगारीचा दर दुप्पट

Akshay Nirmale

Vijay Sardesai: ऐन पर्यटन हंगामात गोव्यातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे केवळ इव्हेंट आयोजित करत असून त्यातून निधी वाया घालवत आहेत, अशी घणाघाती टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

पत्रकार परिषदेत विजय सरदेसाई असे म्हणाले की, गोव्यातील बेरोजगारीचा दर हा देशस्तरीय बेरोजगारी दराच्या दुप्पट आहे. बेरोजगारी दराची राष्ट्रीय सरासरी 7.1 टक्के आहे. तर दर गोव्याचा बेरोजगारी दर 16.2 टक्के इतका आहे.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केवळ आणि केवळ इव्हेंट आयोजित करत आहे. त्यांना फक्त इव्हेंटगिरी करायची आहे. त्यातून ते सरकारचा निधीही वाया घालवत आहेत.

दरम्यान, यापुर्वीही आमदार सरदेसाई यांनी ऑक्टोबर महिन्यात सरकार जाणीवपुर्वक बेरोजगारी वाढवत असल्याची टीका केली होती. बेरोजगारीच्या बाबतीत गोवा देशात सातव्या क्रमांकावर आहे. मंत्र्यांना ही परिस्थिती माहिती नाही, असेही सरदेसाई तेव्हा म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Tiger Reserve: म्हादईत व्याघ्र प्रकल्प होणार का? CEC येणार गोव्यात; गोवा फाउंडेशन-वन अधिकाऱ्यांत खडाजंगी

Goa Live Updates: 7.5 लाख टन खनिजाचा 13 ऑक्टोबरला ई-लिलाव

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रावचे बॅनर्स फाडण्याचा ‘प्रताप’

Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

Goa Road Closure: गोव्यातील 'हा' रस्ता राहणार बंद! प्रवाशांना बसणार मोठा फटका; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT