Vijai Sardesai  Gomantak Digital Team
गोवा

Vijai Sardesai : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पुढे ढकला

घाई नकोच : आमदार विजय सरदेसाई यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

New Education Policy : शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन शैक्षणिक वर्ष जुलैपासून सुरू होईल, असे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे जूनमध्ये तयारीला सुरुवात केली जाईल, शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे जे म्हटले आहे, त्यावरून सरकारची अजूनही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्याबाबत तयारी झालेली नाही, हे स्पष्ट होत आहे.

अशा परिस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने घाई करू नये. काही राज्यांनी सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी पुढे ढकलली आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सामंत समितीवर नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची जबाबदारी सोपवली आहे. या समितीने आणखी सहा महिन्याची मुदत मागितली आहे.

त्यावरुही सरकारची तयारी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. या अभ्यासक्रमात संस्कृती, इतिहास व गोव्याचे स्वरूप यांचा समावेश अत्यावश्यक आहे. सर्वसमावेशक आणि चांगला दृष्टिकोन सुनिश्र्चित करण्यासाठी अभ्यासक आणि तज्ञांनी अहवालाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे, असेही सरदेसाई सांगितले.

शिक्षण म्हटले की शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय महत्त्वाचा असतो. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना या तिन्ही घटकांचा विचार करून सरकारने करायला हवा. विद्यार्थी व पालक तयार आहेत का? याचे सर्वेक्षण करावे, असे सरदेसाई यांनी सूचविले.

पालकांवर परिणाम

सरदेसाई यांनी शिक्षण क्षेत्रातील घटकांशी हे धोरण राबविण्यापूर्वी पुरेशी सल्लामसलत केली नसल्याचा प्रमुख मुद्दा उपस्थित केला, विशेषतः पालकांशी, एनईपीने केलेल्या बदलांसाठी ते तयार नाहीत. परीक्षा संपुष्टात आल्याने आणि सतत मूल्यमापनावर भर दिल्याने पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात अडचणी येऊ शकतात. ही परिस्थिती नोकरी करणाऱ्या पालकांवर आणि कमी शिकलेल्या पालकांवर विपरीत परिणाम करू शकते.

अहवालाचे पुनरावलोकन करा

सामंत समितीने आपले काम पूर्ण करून अहवाल सादर करण्यापूर्वी सरकारने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एनईपी लागू केल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली. अहवालात संस्कृती, इतिहास आणि गोव्याचे स्वरूप या विषयांचा समावेश अपेक्षित आहे. सर्वसमावेशक आणि चांगला दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी अभ्यासक आणि तज्ञांनी अहवालाची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याचे पुनरावलोकन करण्याची आवश्यकता असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT