MLA Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: मुख्यमंत्र्यांवर टीका करून व्यक्त केली नाराजी

CM Pramod Sawant Visit: ‘स्कूल कॉम्प्लेक्स’ इमारत पहाणी करण्‍यासाठी न बोलावल्याने सरदेसाईंची टीका

गोमन्तक डिजिटल टीम

बाेर्डा-मडगाव येथील मोडकळीस आलेल्‍या मल्‍टीपर्पज स्‍कूल कॉम्‍प्‍लेक्‍स इमारतीची काल मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदार दिगंबर कामत यांच्‍यासोबत पहाणी केली. यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी न बोलावल्याने मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका करून नाराजी व्यक्त केली.

यासंदर्भात सरदेसाई यांना विचारले असता, कदाचित मल्‍टिपर्पज शाळेच्‍या कँटीनमध्‍ये मुख्‍यमंत्री सावंत यांना बार उघडायचे असेल. त्‍यामुळेच या जागेची पहाणी करण्‍यासाठी ते दिगंबर कामत यांना घेऊन तिथे गेले असावेत अशी खोचक प्रतिक्रिया फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

शाळा आणि मंदिरांच्‍या परिसरात दारुची दुकाने खुली करण्‍याच्‍या प्रस्‍तावाचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी स्‍वागत केले आहे. मल्‍टिपर्पज प्रकल्‍पात शैक्षणिक संकुले आहेतच त्‍याशिवाय तिथे घोगळेश्‍वराची घुमटीही आहे. यामुळेच असेल कदाचित त्‍यांना येथे बार सुरू करावा, असे वाटले असेल म्‍हणून त्‍यांनी काल ही पहाणी केली असावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्‍यक्‍त करत आपल्‍याला न बोलावल्‍याबद्दल नाराजी व्‍यक्‍त केली.

विजय सरदेसाई, आमदार फातोर्डा

बोर्डा-मडगाव येथील मल्टीपर्पज स्कूल कॉम्प्लेक्स इमारतीचा प्रश्‍न मी विधानसभेत उपस्थित केला होता. इमारतीची पहाणी करण्‍यासाठी मी गोवा साधन सुविधा विकास महामंडळाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालकांना बाेलावले होते. दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकाऱ्यांनाही याची माहिती आहे, अशा परिस्‍थितीत या इमारतीची पहाणी करायची असल्‍यास मला टाळून ती करण्‍यामागे कुठलेही प्रयाेजन नव्‍हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT