Goa ITI: आयटीआय केंद्र दुसरीकडे हलविण्याचे निर्देश

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची गोवा साधनसुविधा महामंडळाच्या अधिकाऱ्याबरोबर इमारतीची पाहणी
CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची गोवा साधनसुविधा महामंडळाच्या अधिकाऱ्याबरोबर इमारतीची पाहणी
Goa ITI CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

बोर्डा येथे आयटीआय तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ज्या इमारतीत चालते, त्या जुन्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या इमारतीतील आयटीआय केंद्र दुसरीकडे हलविण्याबरोबरच प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तात्पुरती जुन्या प्रेझेंटेशन हायस्कूलमध्ये हलविण्याचे निर्देश मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी गोवा साधनसुविधा महामंडळाच्या अधिकाऱ्याबरोबर या इमारतीची पाहणी केली. यावेळी आमदार दिगंबर कामत उपस्थित होते.

येत्या महिनाभरात येथील आयटीआय (ITI) केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार असून त्यानंतर या केंद्रासाठी नवीन जागा पाहून नवीन इमारत बांधून त्यात स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या वर्गांचे स्थलांतर केल्यावर आहे त्या वर्गांची त्वरित दुरुस्ती हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची गोवा साधनसुविधा महामंडळाच्या अधिकाऱ्याबरोबर इमारतीची पाहणी
Goa ITI: गोव्यातील आयटीआय प्रशिक्षणार्थींना टाटा ग्रुपचे 'इंडियन हॉटेल्स' शिकवणार आदरातिथ्य कौशल्य

सध्या या मल्टीपर्पज प्रकल्पात चार मजली नवीन इमारत बांधली आहे. त्यावर आणखी दोन मजले वाढवून या प्रकल्पात जे उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग चालू आहेत ते तिथे हलवून उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचीही डागडुजी साधनसुविधा विकास महामंडळाने हाती घ्यावे अशी सूचना आज त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
Goa Cabinet Expansion Updates
Goa Traffic Fines
Goa maritime development project
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com