Mopa Airport
Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : उद्घाटन झाले! नोकरी, जमिनीचा मोबदला अन् दिलेल्या आश्वासनांचे काय? मोपावरुन विरोधकांचा सवाल

दैनिक गोमंतक

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोपा विमानतळाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. मात्र मोपा विमानतळ होण्याआधी सरकारने स्थानिकांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. तसेच स्थानिकांच्या मागण्या दर्लक्षित राहिल्या असल्याचा आरोप विरोधक करु लागले आहे.

(MLA Vijay Sardesai and Laxmikant Parsekar have criticized the Goa government over the problems of mopa airport)

गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज मोपा विमानतळाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती लावली. व मोपा विमानतळाचे लोकार्पण होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. कारण गोव्याच्या आणि पेडणे तालुक्याच्या विकासात हा महत्त्वाचा घटक ठरेल असे पार्सेकर म्हणाले. यावेळी त्यांनी पेडणेवासीय मात्र नाराज असल्याचे म्हटले.

स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठी सरकारने दिलेला शब्द पाळला नाही

ज्या पेडणेकरांनी विमानतळ पेडण्यात व्हावे म्हणून आग्रही भुमिका घेतली होती. त्याच पेडणेकरांच्या समस्या पुर्ण झाल्या नसल्याचे ते म्हणाले. स्थानिकांच्या नोकऱ्यांसाठी सरकारने शब्द दिला होता. तो पुर्ण केलेला नाही. या विमानतळासाठी ज्यांच्या जमीनी गेल्या त्यांना देखील योग्य मोबदला मिळाला नाही. तसेच स्थानिक टॅक्सी चालकांचा प्रश्न जैसे थे आहे. याकडे लक्ष पुरवत ते तातडीने पुर्ण करणे आवश्यक असल्याचे पार्सेकर म्हणाले.

मोपा हे विमानतळ हे गोमंतकीयांचे आहे भाजपचे नाही

मोपा विमानतळाचे लोकार्पणावेळी काही स्थानिकांना या कार्यक्रमात प्रवेश मिळाला नसल्याचा प्रकार आज घडला आहे, यावरुनच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारवर निशाणा साधला. सरदेसाई म्हणाले की, मोपा हे विमानतळ हे गोमंतकीयांचे आहे भाजपचे नाही. असे खड्या शब्दात सुनावले आहे.

''मोपा भाजपची खाजगी मालमत्ता आहे का?'' काँग्रेसने साधला निशाणा

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोपा विमानतळाच्या उद्घाटनासाठीचे निमंत्रण विरोधी पक्षनेते आणि दक्षिण गोव्याचे खासदार यांना नसल्याने याचा गोवा काँग्रेसने आता संताप व्यक्त केला आहे. यावरुन आज गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गोवा सरकारचा शेलक्या शब्दात समाचार घेतला, व भाजपला हे विमानतळ म्हणजे आपली खाजगी मालमत्ता वाटते आहे का? असा सवाल केला. त्यामुळे मोपाचे उद्घाटन आज पार पडले असले तरी याच मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

SCROLL FOR NEXT