Vijai Sardesai on Unity Mall Place Dainik Gomantak
गोवा

Unity Mall in Goa: ...अन्यथा न्यायालयात धाव घेणार! 'युनिटी मॉल'च्या जागेवरून विजय सरदेसाई आक्रमक

'युनिटी मॉल'मुळे खारफुटी अन् भातशेतीला धोका

Kavya Powar

Vijai Sardesai on Unity Mall Place: राज्यांमधील हस्तकला उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत प्रत्येक राज्यात 'युनिटी मॉल' बांधण्यात येणार आहेत.

गोव्यातील 'युनिटी मॉल'साठी मेरशीमधील जागा निश्चित करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. मात्र त्या जागेबाबत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विरोध दर्शवला आहे.

...अन्यथा न्यायालयात जाणार: सरदेसाई

'युनिटी मॉल'साठीच्या प्रस्तावित जागेमुळे 70 हजार चौरस मीटर खारफुटी आणि 20 हजार चौरस मीटर भातशेती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे मॉलसाठी दुसरी जागा शोधण्याचा प्रस्ताव मी मुख्य सचिवांना केला आहे.

जर हे मान्य झाले नाही, तर याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा यावेळी सरदेसाईंनी दिला. त्यामुळे आता यावर सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गोव्यातील हस्तकला, कला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार 'युनिटी मॉल'ची गोव्यात स्थापना करणार आहे. युनिटी मॉल राज्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्याचे वैभव अनुभवण्यासाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन ठरेल; तसेच यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

Ajit Pawar Plane Crash: आग, धूर अन् विमानाचे तुकडे...! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचे व्हिडिओ, फोटो समोर

SCROLL FOR NEXT