Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

MLA Vijay Sardesai : मायनिंगप्रमाणे मनोरंजन उद्योगही बंद करण्याचा सरकारचा घाट

आमदार सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोव्यात सध्या पर्यटन मोसम तेजीत असताना आणि सर्व धार्मिक सोहळे सुरू झालेले असताना गोवा सरकारला ध्वनिक्षेपक बंदी लादण्याची घाई आहे. अशी घाई करून गोव्यातील खनिज उद्योग प्रमाणे आता राज्यातील मनोरंजन उद्योगही बंद करण्याच्या प्रयत्नात आहे का? असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

( MLA Vijai Sardesai has alleged that the Goa government is trying to shut down the entertainment industry in Goa )

गोव्यात ख्रिसमसचा मोसम चालू आहे. लोकांची लग्ने होत आहेत. अशा परिस्थितीत रात्री १२ वाजेपर्यंतच संगीत वाजवायची मोकळीक लोकांच्या पारंपारिक उत्सवावर नियंत्रण आणणारी आहे. यासाठी सरकारने पुन्हा उच्च न्यायालयासमोर जाऊन आपली बाजू मांडण्याची गरज आहे. किंवा अध्यादेश आणून कायद्यात बदल घडवून आणण्याची गरज त्यानी व्यक्त केली.

मडगावची नगरपालिका आपल्या ताब्यात यावी यासाठी हे सरकार एका रात्रीत अध्यादेश आणू शकते तर ही बंदी शिथील करण्यासाठी का आणू शकत नाही असा सवाल करून की सरकारमान्य इव्हेंट बिनबोभाट पार पडले त्यामूळे आता लोकांच्या इव्हेंटची पर्वा करण्याची गरज या सरकारला वाटत नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT