Sanguem: सांगेत नवीन विकासकामे मार्गी लावणार- सुभाष फळदेसाई

Sanguem: सांगे मतदारसंघाची प्रगतीकडे वाटचाल; वीज, पाणी, रस्ते दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
Sanguem | Subhash Phal Desai
Sanguem | Subhash Phal DesaiDainik Gomantak

Sanguem: सांगे हा पर्यटकांना आकर्षिक करणारा परिसर आहे. त्यामुळे या भागात विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. बॉटनिकल गार्डन, कुणबी व्हिलेज, वोटर स्पोर्ट्स, जनावरासाठी हॉस्पिटल, हेल्थ टुरिजम, योगा सेंटर आधी नवीन विकास कामे मार्गी लागणार आहेत, असेही फळदेसाई म्हणाले.

ते मुक्तिदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी अश्विन चंद्रू, मामलेदार प्रवीणजय पंडित, संयुक्त मामलेदार सीमा गुडेकर, माजी आमदार वासुदेव गावकर, नगराध्यक्ष प्रीती नाईक उपस्थित होते.

Sanguem | Subhash Phal Desai
Jobs in Goa : स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्यांचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी का पाळले नाही?

फळदेसाई पुढे म्हणाले, सांगे मतदारसंघाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. वीज, पाणी, रस्ते दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सांगे हा भौगोलिक दृष्टीने मोठा तालुका असल्याने विकास डोळ्यात भरत नसला तरी आगामी काळात सांगेत दीडशे कोटीची विकास कामे मार्गी लागणार आहे. प्रकल्प हवा म्हणणारे लोक घरात बसून राहतात, मूठभर लोक विरोधासाठी रस्त्यावर येतात.

साडेचारशे वर्षे जुलमी राजवटीत राहूनही गोमंतकीय जनतेने आपली संस्कृती संभाळून ठेवली असून आजही आपल्या संस्कृतीचे रक्षण केले जाते. ‘संजीवनी’त साखर उत्पादन होणार नसले तरी आता त्या ठिकाणी इथेनॉल उत्पादन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, वाटल्यास सांगेतच प्रकल्प सुरू करण्याचा विचार व्यक्त केला, असेही ते म्हणाले.

खाणीविषयी बोलताना फळदेसाई म्हणाले, मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्याला प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकार बरोबर चर्चा करण्यासाठी संधी दिली. त्यात यश आल्यामुळे आज खाण व्यवसाय मार्गी लागत आहे. सबका साथ सबका विकास, होण्यासाठी सांगेच्या नागरिकांनी सहकार्य करावे. देश समृद्ध होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काम करीत आहेत, तो भारत देश जगात महागुरू होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक योजना मार्गी लागणार आहे. यतीन नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

ग्रामस्थांना सहकार्य करा

दुर्गम भागातील लोक कार्यालयात काम घेऊन येतात, त्यांना परत पाठवू नका. त्यांना समजून घ्या आणि त्यांची कामे करा. ग्रामस्थांना नेहमीच सहकार्य करा. त्याच बरोबर काम चुकार कर्मचाऱ्यांना समजून न घेता त्यांना कडक शब्दात अधिकाऱ्यांनी समज द्यावी असेही ते म्हणाले.

दांडो उगेपर्यंत डांबरीकरण करणार

सांगे भागातील दांडो ते उगेपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण पुढील काही दिवसात शुभारंभ होणार आहे. त्याच बरोबर पंचायत भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा उघडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या परिसरातील नागरिकांनी रस्त्यासाठी मागणी केलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com