Salcete: गोवा मुक्तीदिनानिमित्त नाणूस किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा

इतिहास अभ्यासक ॲड. शिवाजी देसाई यांची मागणी, ऐतिहासिक किल्ल्याची दुरवस्था
Nanuz Fort, Salcete
Nanuz Fort, SalceteDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete: गोवा मुक्तीच्या पर्वाला सत्तरी तालुक्यातून सुरवात झाली. या भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी जीवाची पर्वा न करता गोवा मुक्तीच्या संग्रामात सक्रिय भाग घेतला. सत्तरी तालुक्यात आजही अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. यामध्ये नाणूस किल्ल्याचा प्रामुख्याने समावेश आहे.

नाणूस किल्ल्याचा इतिहास मोठा आहे. सध्या या किल्ल्याची अवस्था बिकट होताना दिसत आहे. गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने सरकारने नाणूस किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावा, अशी मागणी इतिहास अभ्यासक ॲड. शिवाजी देसाई यांनी केली.

सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे वाळपई शहीद स्तंभावर आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाळपईच्या नगराध्यक्ष शेहजीन शेख, नगरसेवक सरफराज सय्यद, शेख फैजल, विनोद हळदणकर, सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक प्रेमनाथ हजारे, वासुदेव परब, कृष्णा गावस, श्रीपाद सावंत, गोविंद कोरगावकर, व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण गावस, सरव्यवस्थापक अनंत गावस, हरिश्चंद्र गावस, उदय सावंत उपस्थिती होते.

Nanuz Fort, Salcete
Sanguem: सांगेत नवीन विकासकामे मार्गी लावणार- सुभाष फळदेसाई

वाळपईच्या नगराध्यक्ष शेहजीन शेख म्हणाल्या, की गोव्याचा इतिहास जिवंत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. गोव्याच्या मुक्ती लढ्यात अनेकांचे महत्त्वाचे योगदान आहे. आजच्या पिढीला त्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासाच्या अनेक गोष्टी आज तरुणांसमोर उभ्या राहणे अत्यंत गरजेचे आहे.

मात्र, दुर्दैवाची बाब अशी की अशा गोष्टींचा समावेश हा आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये अशा गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. यावेळी हरिश्चंद्र गावस, वासुदेव परब यांनीही विचार मांडले. स्वातंत्र्यसैनिक गणेश आयकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

‘मुक्ती लढ्याचा दस्तऐवज संवर्धित करा’

ॲड. शिवाजी देसाई म्हणाले, की सरकारने गोवा मुक्तीच्या लढ्यासंदर्भातील ऐतिहासिक दस्तऐवज संवर्धित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यात युवा पिढीला यासंदर्भातची ओळख करून द्यायचे असेल, तर अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाणूस किल्ला हा पोर्तुगीज काळातील गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी निर्माण केलेल्या आव्हानांचा व संघर्षाचा साक्षीदार आहे. यामुळे येणाऱ्या काळात या किल्ल्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com