Venzy Viegas on Dhirio News | Goa Aam Aadmi Party News Updates Dainik Gomantak
गोवा

MLA Venzy Viegas: ओमान एअरलाईन्सने लँडिंगसाठी 'दाबोळी'चा विचार करावा

मोपा विमान तळाच्या निर्णयावर आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी नोंदवली नाराजी

दैनिक गोमन्तक

मोपा विमानतळ प्रवासी सेवा गोव्यासाठी सुरु होणार आहे. याबाबत माहिती देताना ओमान एअरलाईन्सने 1 जानेवारीपासून गोव्यात येणारी सर्व विमाने दाबोळीऐवजी मोपा विमानतळावर उतरवणार असल्याची घोषणा केली आहे. यावरुन बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय बदलण्याची विनंती ओमान विमान कंपन्यांना पत्र देत केली आहे.

(MLA Venzy Viegas has requested Dabolim Airport should be used for Oman Air Service )

मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीपासून एअरलाईन्स दाबोळीचा उड्डाणांसाठी वापर करणार नसून प्रवाशांच्या माहितीसाठी ओमान एअरलाईन्सने ही माहिती जाहीर केली आहे. यावर बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी दाबोळी विमानतळाऐवजी मोपा विमानतळावर प्रवासी सेवा सुरु करावी. यापुर्वीचा निर्णय न बदलता आहे त्या प्रमाणे सुरु ठेवा असे म्हटले आहे.

आमदार व्हिएगस यांनी ओमान विमान कंपन्यांना याचे कारण देताना म्हटले आहे की, मोपा विमानतळ हे गोव्याच्या पर्यटन केंद्रापासून दोबोळीच्या तुलनेने अधिक दुर आहे. त्यामुळे ओमानच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

मोपा विमानतळाचा निर्णय घेतल्यास ओमान एअरलाईनच्या प्रवास खर्चातही वाढ होऊ शकते, कारण इंधनासाठी 120 किलोमीटर अधिकचा प्रवास करावा लागेल. म्हणून हा निर्णय मागे घेत दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी सेवा देणे सुरू ठेवावे. असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

SCROLL FOR NEXT