Sal River 
गोवा

Sal River:...म्हणून मंत्री काब्राल या पदावर लायक नाहीत; आमदार वेन्झी विएगस संतापले

पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांच्यावर आमदार विएगस यांनी केले आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव: शिरवडे मडगाव येथे असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले दुषित पाणी थेट साळ नदीत सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून अवघे 5 लाख रुपये खर्च येणारी दुरूस्ती न केल्याने मागचे कित्येक दिवस हे दूषित पाणी नदीत सोडले जात आहे.

(MLA Venzy Viegas Alleges Minister Nilesh Cabral on Sal River Pollution Issues)

काब्राल यांनी ही जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा

या दुषित पाण्याने साळ नदी संपूर्ण प्रदूषित झाल्याचा आरोप बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस यांनी केला. ही दुरूस्ती तातडीने हाती घेण्याची गरज आहे. याची पूर्ण कल्पना पर्यावरण मंत्री निलेश काब्राल यांना दिली होती. मात्र त्यांनी या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली असून मंत्री काब्राल यांनी ही जबाबदारी स्विकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार वेन्झी विएगस यांनी केली साळ नदीची पाहणी

मागचे काही दिवस साळ नदीचे पाणी काळसर होऊ लागल्याने आज विएगस यांनी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात हा गंभीर प्रकार आला. या प्रकल्पाच्या एका चेंबरचा एक भाग मागच्या महिन्यापासून नादुरुस्त असल्याने सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या चेंबरपर्यंत जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या वाटेतून प्रक्रिया न केलेलेच सांडपाणी थेट साळ नदीत जात असल्याचे दिसून आले आहे.

याबद्दल या प्रकल्पाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराला विचारले असता, या प्रकल्पाचे काही भाग नादुरूस्त असून ते बदलण्यासाठी पाच लाख रुपयांचा खर्च येणार याची कल्पना मंत्री काब्राल यांना एका महिन्यापूर्वीच दिली होती. पण अजून ही दुरूस्ती करण्यात आलेली नाही असे सांगितले.

त्यांनी आपली जबाबदारी पाळली नाही

निलेश काब्राल हे पर्यावरण मंत्री असून साळ नदीत प्रदूषण होऊ नये म्हणून काळजी घेण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यांनी आपली जबाबदारी पाळली नाही त्यामुळे ते या पदावर राहण्यास लायक नाहीत असा आरोप विएगस यांनी केला. आपण मुख्यमंत्री सावंत यांना फोन करून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आहे. त्यांनी ताबडतोब या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे. असे विएगस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT