Ulhas Tuenkar Dainik Gomantak
गोवा

गोव्यात रेल्वे दुपदरीकरण विरोधाला आमदार तुयेकरांकडून समर्थन

गोयांत कोळसो नाका संघटनेचा दावा: आतापर्यंत आठ आमदारांची भेट

दैनिक गोमन्तक

मडगाव : पाश्चिम घाट परिसरातून रेल्वे मार्ग दुपदरीकरण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणलेले असताना हे निर्बंध इतर मार्गासाठी नाहीत, अशी भूमिका घेत वास्को ते मडगावपर्यंतच्या दुपदरीकरणाचे काम पुढे रेटण्याचे रेल्वेने ठरविल आहे. (MLA Ulhas Tuenkar opposes railway double tracking in Goa)

आतापर्यंत आम्ही भाजपचे नावेली आमदार उल्हास तुयेकर यांच्यासह आठ आमदारांची भेट घेऊन त्यांना आमची बाजू पटवून देणारे निवेदन सादर केले आहे. उल्हास तुयेकर यांच्यासह सर्व आमदारांनी आमच्या मागण्यांना समर्थन दिले आहे, अशी माहिती या संघटनेचे सहनिमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी सांगितले.

या मार्गाला विरोध करणाऱ्या ‘गोयांत कोळसो नाका’ या संघटनेने आक्रमक रुप घेत हा मार्ग जात असलेल्या सर्व आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना या विस्तारित मार्गाला विरोध करण्याची मागणी केली आहे. हा मार्ग फक्त कोळसा वाहतुकीसाठी विस्तारित केला जात आहे, हे रेल्वेने न्यायालयात मान्य केले आहे. न्यायालयाच्या निकालाने हे काम बंद पडले आहे. अशा परिस्थितीत वास्को ते मडगावपर्यंतचा मार्ग विस्तारित करण्यासाठी माजोर्डा इरोसी या भागातील घरांवर संक्रांत आणणे अयोग्य असे मत त्यांनी मांडले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आणावा, अशी मागणी आम्ही या आमदाराकडे केली आहे. सोमवारी आम्ही आणखी काही आमदारांना भेटणार आहोत, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

हल्लीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फक्त तीन आमदाराबरोबर बैठक घेवून या विस्तारित मार्गाच्या कामाला संमती देण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी आपला या आंदोलकांना पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT