Ravi Naik  Dainik gomnatak
गोवा

आरक्षणाचा आधार घेण्याऐवजी महिलांनी स्वकर्तृत्व सिद्ध करा; रवी नाईक

दैनिक गोमन्तक

फोंडा : महिला आज पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. संसार सांभाळण्याबरोबरच इतर क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहे, त्यामुळे सर्वचबाबतीत सरस असलेल्या महिलांनी आरक्षणावर विसंबून न राहता स्वतःहून पुढे यावे आणि राजकारणातही (Politics) आपले अस्तित्व सिद्ध करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे (Ponda) आमदार रवी नाईक (Ravi Naik) यांनी केले.

फोंड्यातील सनग्रेस सभागृहात आज (रविवारी) अखिल गोवा वूमन्स फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याचे उद्‍घाटन केल्यानंतर रवी नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सुहासिनी नाईक, वक्त्या डॉ. रेवा दुभाषी, ज्योती कुंकळ्येकर, डॉ. कमलादेवी कुंकळ्येकर, डॉ. सेलिना नाझारेथ, वूमन्स फेडरेशनच्या अध्यक्ष अचला वेरेकर, नगरसेवक (Corporator) रितेश नाईक, आनंद नाईक, पंच दादी नाईक व भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक हे आता भाजपवासी होण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. भाजप प्रवेशापूर्वीच एक दिवस अगोदर रवी नाईक यांनी महिला मेळावा घेत एकप्रकारे आपली लोकप्रियता दाखवून देत शक्तीप्रदर्शनच केले. फोंड्यातील या महिला मेळाव्याला महिलांची प्रचंड गर्दी झाली होती.

डॉ. सेलिना नाझारेथ यांनी औषधे कशी घ्यायची याची माहिती दिली. फार्मसी महाविद्यालयातील व्याख्याता असलेल्या नाझारेथ यांनी औषधांची मात्रा तसेच वेळ पाळणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. वेदनानाशक औषधांचा मारा अतिशय घातक असल्याने आजारावर केवळ डॉक्टरांकडूनच औषधांसाठी मार्गदर्शन घ्या असे सूचवले.

ज्योती कुंकळ्येकर यांनी महिलांत जागृती होणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. पुरातन चालीरीतीचा अवलंब करताना काय खरे आणि काय खोटे याची जाणीव महिलांना असायला हवी असे सांगताना महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बिनधास्त पुढे यावे असे आवाहन केले.

यावेळी सुहासिनी नाईक यांचा रवी नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक अचला वेरेकर यांनी केले. सूत्रसंचालन अंबिषा प्रभू व उर्जा नाडकर्णी यांनी केले. आरती मुंड्ये यांनी आभार मांडले. मेळाव्यात महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम झाले. महिलांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धांत भाग घेऊन बक्षिसे पटकावली.

महिला होताहेत संघटित

अखिल गोवा वूमन्स फेडरेशनतर्फे आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याला मोठी उपस्थिती लाभल्याने महिला फेडरेशनच्या अध्यक्ष अचला वेरेकर यांनी आनंद व्यक्त करीत कोरोनामुळे दरवर्षीच्या या महिला मेळाव्यात खंड पडला होता, पण आता पुन्हा एकदा महिला संघटित होत असल्याचे नमूद केले.

काल आणि आजच्या स्थितीत बराच बदल झाला असून, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध करायला हवे. पूर्वीच्या काळी पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनी खूप सोसले, पण आज कुटुंबातील सदस्यच महिलेला सहकार्य करीत असल्याने महिलांनी आपले कलाकौशल्य सिद्ध करण्यासाठी पुढे यावे. अस मत डॉ. कमलादेवी कुंकळ्येकर यांनी मांडले आहे.

आरक्षणाचा आधार घेण्याऐवजी स्वकर्तृत्व सिद्ध करा ः रवी नाईक

रवी नाईक म्हणाले, आरक्षणामुळे महिला राजकारणात आल्या आहेत. ही चांगली बाब असली तरी आरक्षणाचा आधार घेऊन राजकारणात येण्याऐवजी स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वतःहून राजकारणात महिलांनी प्रवेश करायला हवा. एक महिला केवळ घरच नव्हे तर समाज आणि देश सुसंस्कृत करू शकते, त्यामुळेच महिलांनी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुढे यायला हवे, असे आवाहन रवी नाईक यांनी केले.

सर्वांना बरोबर घेऊन जाणारे राजकारण हवे ः देश सक्षम करण्यासाठी सर्वांनी संघटीत व्हायला हवे. जाती धर्माच्या नावावर राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन जाणारे राजकारण व्हायला हवे. त्यामुळेच देशाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास होणे शक्य आहे. जाती धर्माच्या नावावर भांडणे कराल तर एक पाऊल मागे याल असेसांगताना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी सहकार्य करायला हवे. घरातील कर्त्या पुरुषांनी महिलांचा आत्मसन्मान राखण्याबरोबरच चाळीशीनंतर महिलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT