Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरणाचा तिढा दिवसेंदिवस सुटण्याचे नाव घेत नाही. काल (मंगळवार) मर्सिडीज चालक परेश सावर्डेकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत आमदार राजेश फळदेसाई यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.
राजेश फळदेसाई म्हणाले की, या प्रकारणाचा तपास करण्यासाठी म्हार्दोळ पोलिस असमर्थ आहेत; त्यामुळे या घटनेचा तपास क्राईम ब्रांचकडे द्यावा.
मुख्यमंत्र्यांना पोलीस तपासाबाबत खोटी माहिती देत असल्यामुळे त्यांना वाटते की तपास योग्य दिशेने सुरू आहे. मात्र तसे नाही.
पोलिसांच्या कामावर आता जनतेचा विश्वास उरलेला नाही.
दुसरीकडे, फळदेसाईंव्यतिरिक्त नागरिकांनीही पोलिसांच्या कामाबाबत असंतोष व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या कामावर विश्वास नसल्याचे मत फळदेसाईं व्यक्त केल्यानंतर नागरिकांनीही त्यांना दुजोरा दिला आहे.
यासाठी नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला. आमदार राजेश फळदेसाई हे सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.