Pravin Arlekar Dainik Gomantak
गोवा

सरकारी मराठी शाळा टिकण्यासाठी पाल्यांना मराठी शाळेतच पाठवावे : आमदार प्रवीण आर्लेकर

स्नेहसंमेलनात पालकांना आवाहन

दैनिक गोमन्तक डिजिटल

मराठी सरकारी शाळा टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना सरकारी मराठी शाळेतच अभ्यासासाठी पाठवावे. आज 40 मुले आहेत, पुढच्या वर्षी संख्या शंभर कशी होणार, याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.

तोरसे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे ते बोलत होते. व्यासपीठावर तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, पंच सदस्या स्वाती तोरस्कर, उपसरपंच उत्तम वीर, छाया शेट्ये, स्वाती तोरस्कर, पूजा साटेलकर, विजय तोरस्कर, रमेश बुटे, सीआरपी स्नेहा मोटे, काशिबाई परब, मुख्याध्यापिका सज्जना कोरगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यानी विविध संस्कृतिक कार्यक्रम सादर कलागुणांचे प्रदर्शन केले. पाहुण्याच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका कोरगावकर, परिचय उपासना सावंत, सूत्रसंचालन राखी सावंत, संध्या परब यांनी केले.

शाळेसाठी उभारणार पक्का रंगमंच

सरकारी प्राथमिक विद्यालय तोरसे यांचे स्नेहसंमेलन गत ४० वर्षापासून बंद होते. यंदा प्रथमच तात्पुरत्या स्वरूपाचा रंगमंच आमदार आर्लेकर यांनी उभारून दिल्यानंतर हा कार्यक्रम घेण्यात आला. पुढील वर्षापासून याच ठिकाणी पक्का रंगमंच शाळेसाठी उपलब्ध असेल, अशी ग्वाही आर्लेकरांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT