Mann Ki Baat : कलाकार दत्तगुरू वांतेकर यांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

रांगोळी स्पर्धेतील यशाची ‘मन की बात’मध्ये दखल
Rangoli Art
Rangoli ArtDainik Gomantak

Mann Ki Baat : केंद्रीय संस्कृती मंत्रालयातर्फे दिल्ली येथे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय पातळीवरील रांगोळी स्पर्धेत देशभरातील पाच लाखांपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत साखळी येथील गुरुदत्त वांतेकर विजयी ठरले होते. त्यांच्या या यशाची दखल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात घेत देशाच्या जनतेशी संवाद साधताना गुरुदत्त यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

स्पर्धेत गोव्यातून गुरुदत्त वांतेकर यांनी उल्लेखनीय कला सादर करून महात्मा गांधी यांची रांगोळी साकारत तिसरा येण्याचा मान मिळवला. नुकत्याच दिल्लीत झालेल्या सत्कार समारंभात राजस्थानचे मंत्री अर्जुनराम मेघवाल, दिल्लीच्या मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Rangoli Art
Goa Pollution Control Board: ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी वास्तविक वेळ निरीक्षण प्रणाली

या रांगोळी कलेत त्यांनी यापूर्वी अनेक रिॲलिटीक रांगोळ्या काढल्या असून त्यांची ओळख पूर्ण गोव्यासह बाहेरही आहे. गोव्यातील एकमेव स्पीड पेंटर म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. साखळी व जवळपास भागात त्यांच्या गणेशमूर्ती प्रसिद्ध आहेत. उत्तम कलाकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहे.

"अवघे दोन दिवस शिल्लक असताना सोशल मीडियाद्वारे मला स्पर्धेविषयी समजले. ही स्पर्धा प्रथम जिल्हा पातळीवर झाली. त्यानंतर राज्य व शेवटी देशपातळीवर. त्यात सर्व क्षेत्रात मला तिसरेच बक्षिस मिळाले होते."

"गांधी यांचे रांगोळीद्वारे चित्र रेखाटण्यास दोन दिवसांचा कालावधी लागला. मोदींच्या कौतुकामुळे आपण भारावलो आहोत. आपल्याला गोव्यासाठी काही तरी करता आले याचा अभिमान वाटतो. माझ्या यशात माझ्या कुटुंबाची मोठा वाटा आहे."

- दत्तगुरू वांतेकर.

Rangoli Art
Crime News: बागा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना, मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्‍याचार

शाबासकीची ही थाप अभिमानाची गोष्ट

मी एक कलाकार आहे आणि आपली कला रांगोळीच्या माध्यमातून सादर करणे आपल्याला आवडते. यापुढे देखील सातत्याने वेगवेगळी रांगोळी काढून आपली कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दत्तगुरु वांतेकर म्हणाले.

पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकामुळे गोव्याबरोबर साखळी गावाचेही नाव उज्ज्वल झाले आहे. मोदी यांच्याकडून मिळालेली शाबासकीची थाप ही अभिमानाची गोष्ट आहे, असे ते म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com