MLA Praveen Arlekar Dainik Gomantak
गोवा

Pernem News : छत्रपती शिवाजी महाराजांंचे विचार आदर्शवत प्रवीण आर्लेकर ; धारगळ येथे अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

यावेळी माजी सरपंच अनिकेत साळगावकर, अॕड. मुरारी परब, पंच सदस्य उदय मांद्रेकर, विर्नोडाचे माजी सरपंच देवेंद्र परब, पंच प्रदीप परब, महेश परब, रोहिदास हरमलकर, प्रकाश धुमाळ आदी उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पेडणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांचा आदर  राखून राज्यकारभार  चालवला.

आजही  समाजामध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी छत्रपती  शिवाजी महाराजांच्या विचारसरणीची गरज आहे, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी चिचोळे धारगळ येथे केले.

  धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच अनिकेत साळगावकर यांनी आपल्या  वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या घराशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी प्रवीण आर्लेकर बोलत होते.

यावेळी माजी सरपंच अनिकेत साळगावकर, अॕड. मुरारी परब, पंच सदस्य उदय मांद्रेकर, विर्नोडाचे माजी सरपंच देवेंद्र परब, पंच प्रदीप परब, महेश परब, रोहिदास हरमलकर, प्रकाश धुमाळ आदी उपस्थित होते.

अनिकेत साळगावकर म्हणाले, माझे वडील गोकुळदास यांची आमच्या घरासमोर शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी इच्छा होती.

वडिलांची इच्छा पूर्ण करतानाच या पुतळ्यामुळे नव्या पिढीला शिवाजी महाराजांची विचारसरणी प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले. अॕड. मुरारी परब यांनीही यावेळी विचार मांडले.  

यावेळी रोहिदास हरमलकर, प्रकाश धुमाळ  यांचीही भाषणे झाली. प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन उदय मांद्रेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT