Joshua Peter De Souza Dainik Gomantak
गोवा

ज्योशुआ डिसुझा यांनी एमपीडीए अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

जोसुआ डिसोझा यांची एमपीडीएच्या अध्यक्षपदी झाली होती निवड

दैनिक गोमन्तक

वास्को: म्हापसाचे आमदार तथा गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ज्योशुआ डिसुझा यांनी मंगळवारी मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यांची एमपीडीएच्या अध्यक्षपदी गेल्या महिन्यात निवड झाली होती. परंतु त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. एम पी डी ए च्या अध्यक्षपदासाठी वास्को मधील अनेक राजकीय नेते काही ज्येष्ठ नगरसेवक शर्यतीत होते. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. (MLA JOSHUA PETER DE SOUZA assumes charge as Chairman, Morgaon Planning and Development Authority)

मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाच्या (पीडीए) अध्यक्षपदी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांची काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी त्यांनी या पदाचा रितसर ताबा स्वीकारला. स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षपदी डिसोझा यांची नेमणूक होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र, त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा ताबा घेतला नव्हता. त्यामुळे राजकीय गोटात तर्कवितर्क सुरू होते. पण, मंगळवारी त्यांनी ताबा घेतल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुरगाव पीडीएमध्ये चार आमदारांचा समावेश आहे. त्यांचा तसेच जनतेचा पाठिंबा यांच्या जोरावर कारभार पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्वसामान्यांसाठी माझे नेहमी सहकार्य असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

येथील बफर झोनसंबंधी नौदलाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून सुवर्णमध्य काढण्यास आमचे प्राधान्य असेल. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे हेदेखील लक्ष घालणार आहेत. काँग्रेस आमदार मायकल लोबो हे स्वहित पाहत आहेत. त्यांनी भाजपला सोडले होते. आता भाजपमध्ये येण्यासाठी ते धडपडत आहेत. याचे कारण त्यांना चांगलेच माहिती आहे, असा टोला आमदार जोशुआ डिसोझा यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT