Morjim Dainik Gomantak
गोवा

Morjim: ...अन् चिमुरड्याचा वाचला जीव! आमदार जीत आरोलकर यांची मदत ठरली वरदान

Jeet Arolekar Newborn Help: तब्बल बारा वर्षांनी घरात जन्मलेल्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मत:च गंभीर दोष असल्याचे निदान झाल्याने मोरजीतील एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते.

दैनिक गोमंतक

मोरजी: तब्बल बारा वर्षांनी घरात जन्मलेल्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मत:च गंभीर दोष असल्याचे निदान झाल्याने मोरजीतील एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. गोव्यात या प्रकारच्या गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नसल्याने बाळाला तातडीने गोव्याबाहेर हलविण्याची गरज निर्माण झाली.

अशा बिकट प्रसंगी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. नवजात बाळाच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात आल्यानंतर पालकांनी आमदार आरोलकर यांच्याशी संपर्क साधला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कोणताही विलंब न लावता बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला आणि बाळाला तातडीने तेथे दाखल करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली. या काळात आमदार जीत आरोलकर हे डॉक्टरांच्या संपर्कात राहून बाळाच्या प्रकृतीची माहिती घेत होते.

सात तास गुंतागुंतीची हृदयशस्त्रक्रिया

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवले. त्यानंतर सुमारे सात तास चाललेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना यश मिळाले. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस बाळाला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आला आणि बाळ पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी पालकांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT