वाळपई: येत्या २ वर्षात सत्तरीला भेडसावणारी पाण्याची समस्या सुटणार आहे. आवश्यक तिथे नवीन जलवाहिनी, टाकी आदी सुविधा उपलब्ध केली जात आहे. लवकरच सत्तरी टँकरमुक्त करू, असा निर्धार आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केला.
सत्तरीच्या ग्रामीण भागात अजून मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या वाढत आहे, कारण दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या तसेच जलवाहिनी जीर्ण झाल्याने पाणी पोहचण्यात अडथळा येतो. त्यावर मात करू,असेही त्या म्हणाल्या.
वाळपई पालिका क्षेत्रातील प्रभाग २ मधील गुंडेलवाडा वेळुस येथे पाण्याची टाकी आणि जलवाहिनी घालण्याच्या कामाची पायाभरणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, वाळपई नगरसेवक रामदास शिरोडकर, फैजल शेख, अनिल उसउद्दीन सय्यद, अभियंते मदन देसाई, देवस्थान पुजारी कृष्णा गावकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राणे म्हणाल्या, सत्तरीचा विकास करताना सर्व समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. आता दाबोस प्रकल्पाच्या विस्तारामुळे अनेक भागात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. नगरसेवक रामदास शिरोडकर म्हणाले, पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत होते. मात्र, मंत्री विश्वजित राणे व आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणून पाण्याची समस्या सोडविली आहे.
हनुमान विद्यालय परिसरातील टेकडीवर बांधण्यात येत असलेल्या ३०० घनमीटर क्षमतेच्या नवीन जलसाठ्याशी २०० मिमी व्यासाची वाहिनी मुख्य जलवाहिन्यांना जोडली जाणार आहे. यामुळे वेळुस, गुंडेलवाडा, हनुमान विद्यालय परिसर, आणि ठाणे भागातील लोकांना नियमित पाणीपुरवठा होईल. चेंबर्सचे बांधकाम, रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण करणे, पाणीपुरवठ्यासाठी सुविधा उभारणे. यासाठी रु. १.५७ कोटी मंजूर झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.