Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: ''खाण घोटाळा चौकशी अहवालात माझे नाव असल्यास दाखवा''; आमदार कामत यांचं विरोधकांना खुलं आव्हान

Mining scams: खाण घोटाळ्याशी संबंधित कोणत्याही चौकशी अहवालात माझे नाव असल्यास दाखवा, असे आव्हान आमदार दिगंबर कामत यांनी विरोधकांना दिले.

Manish Jadhav

Digambar Kamat: खाण घोटाळ्याशी संबंधित कोणत्याही चौकशी अहवालात माझे नाव असल्यास दाखवा, असे आव्हान आमदार दिगंबर कामत यांनी विरोधकांना दिले. कामत हे निवडणूक प्रचारादरम्यान खाण घोटाळ्याशी संबंधित उमेदवारासोबत फिरत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हे विधान केले.

भाजपच्या येथील कार्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कामत म्हणाले, खाण घोटाळ्याविषयी न्या. शहा आयोगाने चौकशी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात अनेक आदेश जारी केलेले आहेत. लोकलेखा समितीनेही याविषयी चौकशी केली होती. या साऱ्या चौकशी यंत्रणांनी सादर केलेल्या अहवालांत माझ्या नावाचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे खाण घोटाळ्याचा संबंध माझ्याशी जोडणे सपशेल चूक आहे.

‘खाण घोटाळ्याशी माझा संबंध जोडणे चुकीचे’

अनेक अहवालांत काही नावे आली आहेत. त्यांच्याबाबतीत काय कारवाई करायची हा सरकारचा विषय आहे. सरकार त्याबाबत कारवाई करत असल्याचे विधानसभेत दिलेल्‍या माहितीवरून दिसते. मात्र, निवडणूक आली म्हणून कोणते तरी आरोप करायचे असतात म्हणून माझा संबंध खाण घोटाळ्याशी जोडणे योग्य नव्हे. विरोधकांना सध्या काही काम नाही असेच अशा आरोपांवरून दिसते, असेही दिगंबर कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT