Sarvajanik Ganesh Utsav Mandal Valpoi prize distribution ceremony Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: ‘महिला आरक्षण’ ही चतुर्थीतील ग्रेट भेटच; आमदार दिव्या राणे

वाळपई गणेशोत्सव मंडळातर्फे मान्यवरांचा सत्कार व गुणवंतांचा गौरव

दैनिक गोमन्तक

Sarvajanik Ganesh Utsav Mandal Valpoi: महिला तसेच युवकांना सशक्त करण्याचा ध्यास मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतलेला आहे. सत्तरी तालुक्यातील लोक शांतीप्रीय असून कला, संस्कृती, परंपरा यात आपले जीवन फुलवणारे आहेत.

आता महिलांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारने ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांचा मोठा सन्मान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळेच हे शक्य झाले आहे.

चतुर्थी सणावेळी मोदींनी महिलांना ही ग्रेट भेटच आहे, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार तथा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी केले.

वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गुरुवारी रात्री आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात राणे बोलत होत्या.

यावेळी नगराध्यक्ष शेहझीन शेख, माजी उपसभापती तथा वाळपई गणेशोत्सव मंडळाचे स्थायी समितीचे अध्यक्ष नरहरी हळदणकर, वाळपई गणेशोत्सव उत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर मणेरकर, माजी अध्यक्ष राजेश रायकर, हनुमान देवस्थानचे अध्यक्ष भानुदास वेलींगकर आदींची उपस्थिती होती.

राणे पुढे म्हणाल्या की, वाळपई गणेश मंडळाने एकोपा जपलेला आहे. विविध क्षेत्रातील लोकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून प्रोत्साहन दिले आहे. नवीन पिढीला या लोकांचे कार्य समजले पाहिजे. सण, उत्सवातून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात.

यावेळी नगराध्यक्ष शेहझीन शेख व नरहरी हळदणकर यांनी विचार व्यक्त केले. समीर मणेरकर यांनी स्वागत केले.यावेळी विविध स्तरातील मान्यवर व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थी

यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थी स्वरांगी मराठे (अवर लेडी आँफ लुर्डस हायस्कूल वाळपई), रुतबा बेग (युनिटी हायस्कूल वाळपई), तन्वी गावस(अवलेडी आँफ लुर्डस हायस्कूल वाळपई), कौशल माजिक (भूमिका हायस्कूल पर्ये), इन्फेरा खान (अवर लेडी आँफ लूर्डस हायस्कूल वाळपई)

विश्रुती गावकर (हनुमान विद्यालय वाळपई), प्रियल गावकर (हनुमान विद्यालय वाळपई), अतुल जोशी (हनुमान विद्यालय), सानिका मराठे (अवर लेडी आँफ लूर्डस हायस्कूल), प्रथमेश गावस (भुमिका हायस्कूल पर्ये) यांचा गौरव करण्यात आला.

सत्कारमूर्ती...

शिक्षण क्षेत्रातील सरोजिनी गावकर, क्रीडा क्षेत्रातील डॉ. सनी काणेकर, समाजकार्य क्षेत्रातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पिसुर्लेतील सफाई कामगार रसिका खांडेपारकर, नाट्यकर्मी अभय जोग, शेतकरी प्रशांत राणे व डॉ. अभिजीत वाडकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विजेत्यांना बक्षिसे

कराओके गीत गायन स्पर्धेत प्रथम नवनाथ गावस, व्दितीय स्मितल गावकर, तिसरे फिरोज खान, उत्तेजनार्थ प्रियंका पोळेकर, देवता काणेकर, साईल हळदणकर, किशोर परवार यांना बक्षीसे देण्यात आली.

तसेच गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम घेण्यात सादर करणारे कलाकार तसेच हनुमान विद्यालय व डॉ. केशव बळीराम हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सुत्रनिवेदन किरण नार्वेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT