Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

आमदार दिलायला लोबो: उशिराच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला अपयश

प्रदेश महिला काँग्रेसतर्फे पणजीत सत्कार

दैनिक गोमन्तक

पणजी: निवडणुकीत उमेदवारांचे नाव किमान तीन महिने अगोदर जाहीर होण्याची गरज आहे. काँग्रेसने उमेदवारांची नावे उशिरा जाहीर केल्याने त्यांना प्रचार करण्यास वेळ कमी मिळाला त्याचा परिणाम काही उमेदवार काही मतफरकाने पराभूत झाले, असे मत आमदार दिलायला लोबो यांनी या सत्कारावेळी बोलताना व्यक्त केले. शिवोलीतून निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार दिलायला लोबो यांचा आज काँग्रेस प्रदेश महिला मोर्चातर्फे पणजीतील काँग्रेस मुख्यालयात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष बीना नाईक, डॉ. प्रमोद साळगावकर तसेच मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस आमदार दिलायला लोबो यांनी शिवोलीत केलेल्या धडाकेबाज प्रचारामुळे त्या निवडून आल्या. निवडणुकीची तयारीही त्यांनी सर्वांच्या आधीच सुरू केली होती. त्याचा लाभ त्यांना झाला. त्यामुळे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तेच ध्येय ठेवून कामाला लागावे,असे मत व्यासपीठावरील वक्त्यांनी व्यक्त केले.

आमदार लोबो म्हणाल्या की, गोमंतकीयांना भाजप सरकार पुन्हा सत्तेत नको, असे वाटत होते. या निवडणुकीत 66 टक्के मतदारांनी भाजपविरोधी मतदान केले. मात्र, ही मते विभागणीचा लाभ भाजपला झाला. भाजपविरोधी मतदारांची मने वळवण्यात काँग्रेसला अपयश आले,असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT