Carlos Almeida

 

Dainik gomantak

गोवा

आमदार कार्लोस आल्मेदांनी दिला राजीनामा; कुठल्या पक्षातून लढवणार निवडणूक?

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील दोन आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर मूरगाव मतदारसंघातून..

दैनिक गोमन्तक

वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, तसेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. विधीमंडळ सचिव एन ए उल्मन यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे. वास्कोत आल्यानंतर आल्मेदा कार्यकर्त्यांबरोबर बैठकीस व्यस्त होते.

वास्को मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले वास्कोचे आमदार तथा कदंब महामंडळाचे अध्यक्ष तसेच तीन वेळचे नगरसेवक तथा नगराध्यक्षपद भूषविलेले कार्लोस आल्मेदा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.

मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील दोन आमदारांनी आपल्या आमदारकीचा (MLA) राजीनामा दिला आहे. तर मूरगाव मतदारसंघातून मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अशा प्रकारे मुरगाव तालुक्यातील मतदारसंघातून (Constituency) भारतीय जनता पक्षाचे (BJP) पाठबळ कमी झाल्यातच जमा आहे. कारण मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून भाजपाचा बालेकिल्ला होता. आता कुठ्ठाळी मतदारसंघातून एलिना साल्ढाणा व वास्को मतदारसंघातून कार्लोस आल्मेदा यांनी तर मूरगाव मतदारसंघातून मंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिल्याने मूरगाव तालुक्यात भाजपचे पानीपत झाले आहे.

आता सगळी भिस्त कार्यकर्त्यांवर अवलंबून असून आपला मतदारसंघ साबूत ठेवण्यास माजी आमदार व मंत्री समर्थ आहे की नाही हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) समजेल. राजीनामा देण्याचे कारण आल्मेदा यांना विचारले असता, भाजपने मला दुखावल्यानेच मला पक्ष सोडने भाग असल्याचे ते म्हणाले. आता 2022 मधील विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज मी माझ्या कार्यकर्त्याबरोबर बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच काही वर्षापूर्वी मी कृष्णा साळकर यांच्याविरुद्ध कोमुनिंदाद जमीन घोटाळा प्रकरणी एक तक्रार दिलेली आहे. भाजपने कृष्णा साळकर यांना पक्षात घेतल्यानंतर मला त्यांच्याबरोबर काम करण्यास पक्ष सांगत असून मी मुळीच ते करू शकत नाही. मी स्वबळावर माझ्या कार्यकर्त्यांबरोबर पुढील निर्णय घेईल. त्यानुसार आपण भाजप पक्षातून आणि आमदार पदावरून राजीनामा दिल्याचे सांगितले.

वास्को मतदारसंघाला सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे विकास कामे रेंगाळत असल्याचा आरोप आल्नेदा यांनी केला. यासर्व प्रकारामुळे मी दुखावलेला असून यामुळेच मी राजीनामा दिल्याचे सांगितले. 2022 सालातील निवडणूक कुठल्या पक्षातून लढवणार, ते माझ्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊनच लवकरच योग्य निर्णय घेणार असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT