Mumbai-Goa
Mumbai-Goa Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa: घरच्यांची लग्नासाठी जबरदस्ती, मुंबईची डॉक्टर विद्यार्थीनी गोव्यात अंडरग्राउंड झाली अन...

Pramod Yadav

केरळमधील एक युवक आठ महिन्यांपूर्वी गायब झाला होता. त्याच्या घरच्यांना तेथील पोलिसांनी दुसऱ्या व्यक्तीचे शव दिले होते. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून त्यांनी अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील केले होते. दरम्यान, चौकशी आणि शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता झालेली ही 35 वर्षीय व्यक्ती आठ महिन्यांनंतर गोव्यात सापडली.

आता मुंबईमधून बेपत्ता झालेली एक तरूणी गोव्यात आढळून आली आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनी वेगळ्याच कारणाला कंटाळून गोव्यात मोबाईल फोन बंद करून अंडग्राउंड झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एक 22 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मागील आठवड्यात बेपत्ता झाली. मुंबईतील प्रसिद्ध केम वैद्यकीय महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. तिच्या घरच्यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, एक कुटुंब गोव्यात फिरण्यासाठी आले होते. त्यांना ही मुलगी दिसली व तात्काळ त्यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात संपर्क केला. त्याच्या घरच्यांनी मुलीला फोनवर बोलण्याची विनंती केली व त्यानंतर हा 22 वर्षीय युवती मुंबईत परतली. मालाडमध्ये तिची आपल्या घरच्यांसोबत भेट झाली.

का सोडले होते युवतीने घर?

वैद्यकीय शिक्षण घेणारी ही विद्यार्थिनीवर घरचे लग्नासाठी जबरदस्ती करत होते. त्याच्या घरच्यानी नातेवाईकातील एका मुलाशी तिचा विवाह ठरवण्यात आला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी घरचे जबरदस्ती करत होते. दरम्यान या सगळ्याला कंटाळून मुलीने गोवा गाठला व आपला मोबाईल बंद करून ठेवला.

त्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. अखेर एक आठवड्यानंतर ती सुखरूप घरी परतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

SCROLL FOR NEXT