Missing construction permit complaint for Bhutani Infra project Canva
गोवा

Bhutani Infra: ‘ती’ तक्रारच गहाळ! 'भूतानी' बांधकाम प्रकल्पाबाबत नवा गोंधळ

Bhutani Project: या साऱ्या प्रकरणात पंचायत खात्याकडून कोणती चूक झाली आहे का, याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bhutani Infra Project Sancoale

पणजी: सांकवाळ येथे भूतानी इन्फ्रा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मे. परमेश कन्ट्रक्शन कंपनीच्या प्रकल्पाला स्थानिक पंचायतीने दिलेल्या बांधकाम परवान्याबाबत तक्रार पंचायत संचालनालयातून गहाळ झाली आहे. माहिती हक्क कार्यकर्ते नारायण नाईक यांनी मार्चमध्ये केलेल्या या तक्रारीची माहिती समाज माध्यमांवर दिल्यानंतर आता ‘त्या’ तक्रारीची शोधाशोध पंचायत संचालनालयात सुरु झाली आहे.

दरम्यान या साऱ्या प्रकरणात पंचायत खात्याकडून कोणती चूक झाली आहे का, याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली आहे.

मुरगाव नगर नियोजन प्राधिकरणाने (Mormugao Planning And Development Authority) काही अटींसह विकास परवाना जारी केला होता. त्या अटींची पूर्तता केल्याचे कोणतेही पुरावे तसेच बांधकाम परवान्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे न घेताच बांधकाम परवाना जारी केल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. त्यांनी पंचायत सचिवांकडून तशी माहिती माहिती अधिकारात मिळवल्यानंतर पंचायत संचालनालय तसेच सरकारकडेही तक्रारी केल्या होत्‍या. त्यापैकी एक तक्रार पंचायत संचालनालयाकडून मुरगावच्या गट विकास कार्यालयाकडे चौकशीसाठी पाठवण्यात आली होती. गट विकास कार्यालयाकडून चौकशीनंतर अहवालही पंचायत संचालनालयाला सादर करण्यात आला होता.

म्हणून मूळ तक्रार हवी!

आता नाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा विषय ताजा झाला आहे. नाईक यांच्या तक्रारीवर पुढे काय केले, याचा न्यायालयात जाब द्यावा लागणार असल्याने ती मूळ तक्रार कुठे गेली याची शोधाशोध करण्यात येत होती. सोमवारी ती तक्रार शोधणे हे एकमेव काम पंचायत संचालनालयाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. तरीही तक्रार मिळालेली नाही. दरम्यान, नाईक यांनी याच स्वरूपाची आणखी एक तक्रार सचिव (पंचायत) संजीव गोयल यांच्या ईमेलवर पाठवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT