Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

Revolutionary Goans: जमीन खरेदीसंदर्भात ‘आरजी’कडून दिशाभूल

मायकल लोबो यांची टीका: आल्मेदावाडा-पर्रात नाला दुरूस्तीचे काम सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाकडून जमिनींच्या खरेदी-विक्रीबाबत गोव्यातील लोकांना मूर्खात काढण्याचा प्रयत्न होतोय. मुळात भारतीय व्यक्ती देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करु शकते. जमिनी विक्री व्यवहारसंदर्भात कायदेशीर निर्बंध नाहीत.

अशावेळी आरजी गोमंतकीयांना दिशाभूल करत असल्याचा आरोप करीत कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी आरजी तथा या पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांच्यावर निशाणा साधला.

मंगळवारी (ता.30) आल्मेदावाडा, लिंगभाट-पर्रा येथे नाल्याच्या सुधारणेच्या कामाचा लोबोंच्या हस्ते आरंभ झाला. त्यावेळी मायकल लोबो म्हणाले, गोव्यातील जमिनी या गोमंतकीयांनीच खरेदी किंवा लागवड कराव्यात. हे मत असू शकते.

मात्र, कायद्यासमोर मताला महत्त्व नसते. त्यामुळे आरजीने लोकांना मूर्खात काढणे बंद करावे. अशा प्रकारे निर्बंध लादण्याचा कायदा आणूच शकत नाही. राहिला प्रश्न डोंगराळ किंवा बागायती जमिनी सांभाळण्याचा तर त्यासंदर्भात आणखी समर्पक कायदा आणता येऊ शकतो. मात्र, लोकशाही भारतात जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आणू शकत नसल्याचे स्पष्टीकरण लोबोंनी दिले.

दंडात्मक कारवाईने अपघात थांबणार?

सध्या सरकारकडून पोलीस उपनिरीक्षकांना दिवसाला 40 उल्लंघनाची प्रकरणे अनिवार्यपणे नोंदविण्यासाठी टार्गेट दिले जाते. मुळात दंडात्मक कारवाईमुळे अपघातांवर नियंत्रण येणार नाही.

किंबहुना वाहन चालकांवर दंड लागू करून रस्त्यावरील वाहन चालकांत शिस्त येणार नाही. तर वाढत्या अपघातांवर नियंत्रण हवे असल्यास जागोजागी दिशादर्शक फलक उभारणे व अपघात प्रवण क्षेत्राची ओळख पटविणे गरजेचे.

तसेच गतिरोधकांवर रंगरंगोटीचे काम करावे. फलकांची उभारणी केल्यास अपघातांवर नियंत्रण येईल, असे लोबोंनी वाढत्या वाहन शुल्काबाबत विचारलेल्या प्रश्नांवर टिप्पणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT