miramar over head bridge demolition  Dainik Gomantak
गोवा

Miramar Bridge: ...अखेर धोकादायक बनलेला पदपूल हटविला!

Miramar Over Head Bridge: लोखंडी असलेला हा पूल गॅस कटरच्या साह्याने कापून काढण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मिरामार- दोनापावला रस्त्यावर शारदा मंदिर स्कूलच्या प्रवेशद्वारापासून जवळ असणारा आणि धोकादायक बनलेला पदपूल अखेर महानगरपालिकेने हटविला आहे. शनिवारी या पुलाचा अर्धाभाग हटविला गेला होता. आज सकाळी उर्वरित अर्धा भाग हटविण्यात आला. लोखंडी असलेला हा पूल गॅस कटरच्या साह्याने कापून काढण्यात आला.

मिरामार येथील पूल हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देताच महानगरपालिकेने शुक्रवारीच या कामाला सुरुवात केली. दहा लाख रुपये खर्च करून पदपूल हटविण्यात आला आहे. पुलाचा वरील भाग काढून तो रस्त्याच्या बाजूला ठेवला असून, त्याचे भाग कापल्यानंतर तेथून ते हटविले जाणार आहे.

गेली तीन दिवस महानगरपालिका अभियंते विकास पार्सेकर व त्यांचे सहकारी दिवसांतून तीनवेळा त्याठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आहेत. याशिवाय वाहतूक विभागाचे पोलिसही याठिकाणी हजर होते.

पुलाचे सांगाडे पदपथावर

शुक्रवारपासून मिरामार ते दोनापावला रस्ता बंद झाल्याने रविवारी सायंकाळपर्यंत वाहने मिरामार इंटरनॅशनल हॉटेल, सायन्स सेंटर मार्गे ये-जा करीत होती. सायंकाळी उशिरा आठच्या सुमारास वाहतूक खुली करण्यात आली. पुलाचे सांगाडे रस्त्याच्या बाजूच्या पदपथावर ठेवण्यात आले असून, उद्या, त्याची कापणी होऊन त्याचे भाग वेगवेगळे केले जातील, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT