Miramar Gomantak Digital Team
गोवा

Illegal Construction in Panaji : मिरामार क्रॉस बांधकाम वादात

फाईल्स सादर करा; खंडपीठाने महापालिकेला सुनावले

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Construction in Panaji : मिरामार सुमद्रकिनारा येथील रस्ता सर्कलजवळील क्रॉसच्या नुतनीकरणाच्या नावाखाली कथित बेकायदेशीर सौंदर्यीकरण होत आहे. स्मार्ट सिटी कंपनी, पीडब्ल्यूडीची परवानगी नसूनही बांधकाम सुरूच आहे.

या घटनेची खंडपीठाने गंभीर दखल घेत या बांधकामाबाबत पणजी महापालिकेला दस्तावेज व निर्णय घेतल्याची फाईल उद्या, बुधवारी सुनावणीवेळी घेऊन येण्याचे निर्देश दिले.

या क्रॉसच्या नुतनीकरण्याच्या नावाखाली तेथे उच्च दर्जाच्या मार्बलचा वापर करून तसेच तेथील जागेसाठी कोणतेच परवाने न घेता हे अवैध बांधकाम सुरू असल्याचे एका जागरूक नागरिकाने खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

अन् खंडपीठ संतापले!

बांधकाम करणारी व्यक्ती कोण आहे, याची माहिती खंडपीठाला सरकारी वकील देऊ शकले नाहीत. त्यामुळे खंडपीठाने संताप व्यक्त केला.

या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून तपास करून दोषींवर गुन्हा दाखल करणेच आता बाकी उरले आहे, असे खडेबोल सुनावले. संबंधित अवैध बांधकाम पाडून ते बुधवारपर्यंत पूर्वस्थितीत करा, अशी तोंडी टिप्पणीही खंडपीठाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT