Ramdev Baba In Goa  Dainik Gomantak
गोवा

Ramdev Baba In Goa : 'पतंजलीचे सर्वात मोठे केंद्र गोव्यात उभारणार' -योगगुरु रामदेव बाबा

योग, प्राणायाम, आयुर्वेद व प्राकृतिक चिकित्सा उपचारांच्या शिबिराची सुरूवात मिरामार समुद्र किनारी होत आहे.

दैनिक गोमन्तक

Ramdev Baba In Goa : योग, प्राणायाम, आयुर्वेद व प्राकृतिक चिकित्सा उपचारांच्या शिबिराची सुरूवात मिरामार समुद्र किनारी होत असून या शिबिराला दररोज सुमारे 10 हजार नागरिक, अनुयायी, साधक हजेरी लावतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

योग शिबिरासाठी येणाऱ्यांची सोय करण्यात आली असून तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. शिबिरास पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.

शिबिराच्या पूर्वसंध्येला योग गुरू स्वामी रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, गेल्या दोन दशकात गोव्याशी आत्मिय प्रेम आहे. त्यामुळे शिवरात्रीसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाच्या अनुषंगाने योग, प्राणायाम, आयुर्वेद व प्राकृतिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रोग मुक्ती आणि नशा मुक्ती हाच आमचा प्रथम अजेंडा आहे. ते ईडीसी हाऊस येथे बोलत होते. यावेळी स्वामी परमार्थ देवजी, कमलेश बांदेकर, साध्वी देवप्रियाजी, आणि डॉ. एन.पी.सिंग उपस्थित होते.

शिक्षक, विद्यार्थ्यांसोबत होणार चर्चा : समाजात अश्‍लिलता वाढत असून चित्रपट मालिकांच्या जकाट्यात युवा व मुले येत आहेत. त्यामुळे मुले ही भारतीय मूल्य जपणारी, राष्ट्राचे गुणगौरव वाढवणारी व्हावी यासाठी 20 रोजी राज्यातील 5 हजार शिक्षक व विद्यार्थ्यांची बैठक डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होणार असून भारतीय शिक्षा बोर्डशी संलग्न करण्यासाठीची ही बैठक असेल.

मातृभूमीप्रती अखंड श्रद्धा वाढविणारी पिढी व्हावी यासाठी प्रयत्नरत राहू असे त्यांनी सांगितले. तसेच गोव्याला दक्षिण भारतातील पतंजलीचे महत्त्वाचे केंद्र व्हावे, वैचारिक गुलामगिरीतून दर करण्यासाठी केंद्र व्हावे अशी ईच्छा असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले.

तालुकावार बससेवा

सर्वांच्या सोयीसाठी तालुकावार तसेच काही गावातून योग शिबिरात येण्यासाठी बससेवा देखील उपलब्ध करण्यात आली.

शनिवारी महाशिवरात्र असल्याने नागरिकांना शिवपिंडीला अभिषेक करता यावी, पूजन करता यावे यासाठी बारा ज्योतिर्लिंग तसेच प्रसिद्ध वाळू शिल्पकार मानस साहू यांच्याद्वारे शिवपिंडीचा देखावा साकारण्यात आला आहे. शिबिराला उपस्थित राहण्यासाठी दररोज बससेवा असणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्रताप वळवईकर यांनी दिली.

सनातन संगीत महोत्सव

मिरामार समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळी प्रख्यात गायक कैलास खेर व इतरांद्वारे सायं. 7 वा. संगीत महोत्सवाचे आयोजन केल्याचे स्वामी रामदेव यांनी सांगितले. ते म्हणाले, सनातन शब्दात जीवनाची सर्व शाश्‍वत मूल्य येतात. तो सर्व धर्मांशी संबंधित आहे. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माची मूळ मूल्ये यात समाविष्ट होतात. त्यामुळे सनातन हा निर्विवाद शब्द आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

Agonda Beach: आगोंद ‘कासव संवर्धन’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांची रेलचेल! न्‍यायालय संतप्‍त; दिले चौकशीचे आदेश

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

SCROLL FOR NEXT