Wooden Floar At Miramar Beach Dainik Gomantak
गोवा

Miramar Beach: सौंदर्यीकरणावर भर पण दर्जा? मिरामारवरील 'वूडन फ्लोअर' वाळूत गायब

Miramar Wooden Floar: वूडन फ्लोअर किनाऱ्यावरील वाळूत गायब झाला असल्याने या कामाचा दर्जादेखील स्पष्ट झाला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरकारच्या सरकारी कामांवरील लोकांचा विश्वास कमी होऊ लागला आहे. याचेच अजून एक उदाहरण म्हणजे गेल्यावर्षी मिरामार समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेले वूडन फ्लोअर. यावर्षी वूडन फ्लोअर किनाऱ्यावरील वाळूत गायब झाला असल्याने या कामाचा दर्जादेखील स्पष्ट झाला आहे.

वूडन फ्लोअर हा प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करणारा होता. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ‘अमृत मिशन’अंतर्गत हा प्रकल्प उभारला होता. याचे व्यवस्थापन योग्यप्रकारे न झाल्याने सर्व खर्च वाळूत गेल्याचे दिसत आहे.

मिरामार येथील वूडन फ्लोअरमधील वूडन नाहीसे झाले आहेत. तसेच फ्लोअरची मांडणी वर-खाली झाल्याने पावसाचे पाणी येथे साचले आहे. संबंधित विभागाने काम केल्यावर त्याची देखभाल करण्यावरदेखील भर द्यायला हवा होता. मात्र, ते न केल्याने आज कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकार सौंदर्यीकरणावर भर देत असले तरी ते टिकवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होते.

कामाचा सुमार दर्जा

भाजप सरकारचा ‘मिशन टोटल कमिशन’ असा नारा आहे, असे आरोप वारंवार काँग्रेसने केले आहेत. या आरोपांचे खंडन उत्तम दर्जाचे काम करून केले पाहिजे होते; पण सरकारने कामाच्या दर्जावर भर न दिल्याचे मिरामार येथील वूडन फ्लोअर प्रकल्पावरून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT