Mirabag Protest Dainik Gomantak
गोवा

Mirabag: 'मीराबाग' बंधाऱ्यामुळे गंभीर परिणाम होण्याची शक्यता! संगमेश्वर देवस्थान समितीचा विरोध; निवेदन केले सादर

Mirabag Zuari river dam: प्रस्तावित बंधाऱ्याच्या बांधकामाला संगमेश्वर देवस्थान समितीने विरोध दर्शवत सांगे येथील उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन सादर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: मीराबाग येथे झुआरी नदीवर प्रस्तावित बंधाऱ्याच्या बांधकामाला संगमेश्वर देवस्थान समितीने विरोध दर्शवत सांगे येथील उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन सादर केले. या बंधाऱ्यामुळे ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर तसेच नदीकाठच्या गावांवर गंभीर धार्मिक, पर्यावरणीय व सामाजिक परिणाम होण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.

संगमेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष सुप्रज नाईक तारी यांनी सचिव प्रशांत नाईक, खजिनदार साईश मालवणकर, उपाध्यक्ष विश्वनाथ नार्वेकर तसेच कार्यकारिणी सदस्य विनय नाईक व दीपक लोहार यांच्या उपस्थितीत हे निवेदन दिले.

प्रस्तावित बंधाऱ्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कायम वाढल्यास मंदिर सतत पाण्याखाली राहण्याची शक्यता असून त्यामुळे दर्शन, अभिषेक, आरती, प्रसाद वितरण तसेच अस्थी विसर्जनासारखे धार्मिक विधी अडथळ्यात येऊ शकतात, असे समितीने नमूद केले आहे.

तसेच नदीच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाल्यास जलीय जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता असून पाणी साचल्याने डासांची वाढ होऊन मलेरिया, डेंग्यू यांसारख्या जलजन्य रोगांचा धोका वाढू शकतो.

याशिवाय सांगे मतदारसंघातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यताही संगमेश्वर देवस्थान समितीने निवेेदनात व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सविस्तर पर्यावरणीय, सामाजिक व सांस्कृतिक परिणामांचा अभ्यास करून आवश्यक चर्चा पूर्ण होईपर्यंत हा प्रकल्प स्थगित ठेवावा, अशी मागणी समितीने केली आहे.

अनोखा आध्यात्मिक अनुभव

सुप्रज नाईक तारी यांनी सांगितले की, शतकानुशतके जुने असलेले भगवान शिवाला समर्पित संगमेश्वर मंदिर पवित्र नदी संगमावर वसलेले असून येथे स्वयंभू शिवलिंग आहे. भरती-ओहोटीमुळे दररोज ओहोटीच्या वेळी हे शिवलिंग दोनवेळा प्रकट होते, तर भरतीच्या वेळी नदीचे पाणी त्याचा नैसर्गिक अभिषेक करते. हा अनोखा आध्यात्मिक अनुभव भाविकांना पिढ्यान्‌पिढ्या मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT