Mirabag Savardem | Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mirabag: 49 दिवसांचा लढा यशस्वी! मीराबाग बंधारा रद्द; ‘त्‍या’ चौघांवरील तक्रारीही मागे घेणार, CM सावंतांची घोषणा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्‍‍वासन दिले की, प्रकल्प रद्द केल्‍याचा लेखी आदेश फाईलवर नोंदविला जाईल. तसेच आंदोलनकर्त्यांच्‍या अन्‍य मागण्‍याही मान्‍य केल्‍या.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी/सांगे/पणजी: मीराबाग-सावर्डे येथील नागरिकांचे बंधारा प्रकल्पाविरोधातील ४९ दिवसांचे आंदोलन संपुष्टात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगावात आंदोलनकर्त्यांना भेटून हा प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्‍‍वासन दिले की, प्रकल्प रद्द केल्‍याचा लेखी आदेश फाईलवर नोंदविला जाईल. तसेच आंदोलनकर्त्यांच्‍या अन्‍य मागण्‍याही मान्‍य केल्‍या. त्‍यात प्रकल्प जागेवर खोदलेले मोठे खड्डे बुजविणे, कस्टीमळ ते मीराबाग रस्त्याचे पुढील पंधरा दिवसांत हॉटमिक्सिंग करणे व विधानसभेत आवाज उठवणाऱ्या ‘त्‍या’ चौघांवरील तक्रारी मागे घेणे या मागण्‍यांचा समावेश आहे.

आंदोलनास्‍थळी उपस्थित माजी मंत्री दीपक पाऊसकर, उपेंद्र नाईक, संकेत भंडारी यांच्यासह इतर नेत्यांनी मुख्यमंत्री व सरकारचे आभार मानले. दीपक पाऊसकर यांनी मीराबागवासीयांच्‍या विशेषतः महिलांच्या संघर्षाची स्तुती केली.

उपेंद्र नाईक यांनी आरटीआयद्वारे प्रकल्पाशी संबंधित माहिती मिळवण्याचे उद्दिष्ट सांगितले. संकेत भंडारी यांनी हा विजय संपूर्ण गोमंतकीयांचा असल्याचे नमूद केले आणि प्रकल्पाच्या जागी आनंदोत्सव साजरा करण्‍यात येणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकर आणि मीराबाग प्रभागाचे पंच संजय नाईक यांच्याशीही चर्चा केली. पंचांनी आंदोलनकर्त्यांना प्रकल्प रद्द झाल्‍याबाबतचे अधिकृत पत्र देण्याची सूचना केली होती. यापूर्वी सरपंच चिन्मयी नाईक यांनी १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना अधिकृत पत्र पाठवून लोकभावना लक्षात घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, मुख्‍यमंत्र्यांच्‍या आश्‍‍वासनानंतर मीराबागवासीयांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. श्रीकृष्ण देवाचे दर्शन घेतले, श्री काऱ्या-म्हारू आजोबाला गाऱ्हाणे घालून गावावर कृपादृष्टी ठेवण्याची प्रार्थना केली आणि बंधारा रद्द करण्यात सहकार्य केलेल्या सर्व घटकांचे आभार मानले.

रस्‍त्‍यावरच ठिय्‍या आंदोलन

१ मीराबाग आंदोलनकर्त्यांनी सोमवारी ‘चलो आझाद मैदान’ अशी हाक दिल्यानंतर पणजीत मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकतो याची दखल घेऊन पोलिसांनी पहाटेपासूनच आंदोलनकर्त्यांवर पाळत ठेवली होती.

२ हे लोक आपल्या वाहनांतून आझाद मैदानाकडे जात असताना कुडचडे पोलिसांनी मीराबाग पुलावरच ही वाहने अडविली. त्‍यामुळे मीराबागवासीयांनी गावात रस्‍त्‍यावरच ठिय्या आंदोलन केले.

३ मुख्यमंत्री यावेळी सांगे येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या लोकार्पणासाठी आले होते. पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले की, प्रकल्प होणार नाही. त्‍यामुळे आंदोलनकर्त्यांनी उगाचच आपल्‍या आरोग्‍यावर परिणाम करून घेऊ नये.

४ दुपारी काही आंदोलक मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेण्यासाठी मडगावात गेले. त्‍यांना मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले की, आजच फाईलवर ‘कॅन्सल्ड’ असा शेरा मारतो. तुम्ही माहितीहक्क कायद्याअंतर्गत त्याची प्रत मिळवू शकता.

पणजीत जमावबंदी आणि पोलिसांचा पहारा

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पणजीतील आझाद मैदान परिसरात २०२३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अंतर्गत जमावबंदी लागू केली. आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी पोलिसांची मोठी फौज मैदानावर तैनात केली गेली. गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी सांगितले की, कांपाल व आझाद मैदान आंदोलनासाठी राखीव असतानाही तेथे बंदी घालणे चुकीचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Soham Naik: 'सोहम नाईक'च्‍या अडचणी वाढल्‍या! सज्ञान महिलेसह 5 FIR दाखल; जामीन मिळणे झाले अवघड

Rashi Bhavishya: भाग्योदय होणार! मार्च एंडिंग ठरणार 'या' राशींसाठी खास; आर्थिक स्थितीत होणार बदल

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT