Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Congress: दक्षिणेत अल्पसंख्याक उमेदवारच हवा

Goa Congress: काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी : लोकसभेच्‍या अनुषंगाने वेळ्ळीत बैठक

दैनिक गोमन्तक

Goa Congress: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दक्षिण गोव्यात बुथनिहाय बैठकांना आजपासून सुरूवात केली. वेळ्ळी येथे झालेल्या बैठकीत दक्षिण गोवा मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवारच द्यावा, तो बदलला जाऊ देऊ नये, अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांनी केली.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, उपाध्यक्ष एम. के. शेख, कॅ. विरियातो फर्नांडिस, मिरियानो रिबेलो, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, चिंचोणे-असोळणा पंच सदस्य उपस्थित होते.

काँग्रेसचे अस्तित्व राहिले नसल्याचा अपप्रचार सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. परंतु या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपली ताकद दाखवून देईल.

महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा गर्तेत समाज अडकला आहे आणि तोच समाज भाजपला सत्तेवरून खाली खेचणार आहे. पक्षाची भूमिका, धोरणे गट समित्यांनी सर्वसामान्य मतदारांपर्यंत नेणे आवश्यक आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे आमदार फुटून भाजपमध्‍ये गेले असले तरी काँग्रेसचा उमेदवार पुन्हा बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाच्‍या सर्व कार्यकर्त्यांवर आहे. दक्षिण गोवा नेहमीच काँग्रेसचा पाठीराखा राहिला आहे. भाजपला केंद्रातून खाली खेचण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी निर्माण झाली आहे.
- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT