police  Dainik Gomantak
गोवा

Crime News: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मडगाव पोलिस मुख्यालयात काम करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला फोंडा पोलिसांनी काल अटक केली.

दैनिक गोमन्तक

फोंडा: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मडगाव पोलिस मुख्यालयात काम करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला फोंडा पोलिसांनी काल अटक केली. हा पोलिस कॉन्स्टेबल पणसुले-पिळये, धारबांदोडा येथील रहिवासी असून त्याचे नाव विजय रोहिदास गावणेकर (28) असे आहे.

(minor girl was raped by police in goa)

गावणेकर याने अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडल्याने या परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्वरित विजय गावणेकर याला अटक करण्यात आली. याकामी फोंड्यातील एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांना सहकार्य केले.

गावणेकर याने पीडितेशी मैत्री करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बलात्कारानंतर भेदरलेल्या मुलीची मानसिक अवस्था पाहून मुलीच्या वडिलांनी पोलिस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार फोंडा पोलिसांनी विजय गावणेकर याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT