Minor Girl Assault Case Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नेपाळी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद

Minor Girl Assault Case Goa: राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना चिंतेचे कारण ठरत आहेत. पोलिसांचा वचक कमी होत चालला आहे का? असा सवाल गोमंतकीयांकडून उपस्थित केला जात आहे.

Manish Jadhav

Minor Girl Sexual Assault Goa Nepalese Man Arrested

मडगाव: राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना चिंतेचे कारण ठरत आहेत. पोलिसांचा वचक कमी होत चालला आहे का? असा सवाल गोमंतकीयांकडून उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान, मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एका अल्पवयीन मुलीला स्कूटरवरुन नेऊन तिच्यावर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घडली. याप्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) एका नेपाळी तरुणाला अटक केली. शुभम ओली असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हाही दाखल केला. संशयितांवर गोवा बाल कायदा कलम 8 आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याची पोलिसांनी नोंद केली. उपनिरीक्षक सोनल गावकर पुढील तपास करत आहे. 

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, गोवा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उभा राहतो. यापूर्वीही अशा काही घटना घडल्या असून पोलिसांनी अशा घटनांविरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी गोमंतकीयांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT