Usgao Missing Girl Dainik Gomantak
गोवा

Usgao Missing Girl: उसगांवमध्ये नववीत शिकणारी मुलगी बेपत्ता, काही तासांत फोंड्यातील दुसरी घटना; पोलिसात तक्रार दाखल

Missing Girl: उसगांव अवंतीनगर येथील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आलीय.

Sameer Amunekar

फोंडा: कसलये-तिस्क येथे गुरूवारी (६ मार्च) ५ वर्षीय मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अशातच आता उसगांव अवंतीनगर येथील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आलीय.

गुरूवारी कसलये-तिस्क येथे एका घराच्या बाजूला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह जमिनीत गाडलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत मुलीचे नाव अमैरा ज्युडान अन्वारी असे आहे.

ज्या घराच्या शेजारी हा मृतदेह गाडला गेला होता, त्या घरमालकाला पत्नीसह फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हा प्रकार खुनाचा गुन्हा म्हणून नोंद केला आहे. अशातच आता उसगांव अवंतीनगर येथील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

गुरूवारची घटना ताजी असतानाच उसगांव अवंतीनगर येथील नववीत शिकणारी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचं समोर आलंय. याबाबत फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. स्थानिक नागरिक आणि मुलीच्या कुटुंबीयांशी चर्चा करून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT