Minor Girl Missing Goa Dainik Gomantak
गोवा

शाळेसाठी घराबाहेर पडलेली 'ती' परतलीच नाही, माशेलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी गायब; पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Minor Girl Missing Goa: माशेल येथून 13 वर्षे 5 महिन्यांची एक अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

Manish Jadhav

माशेल: माशेल येथून 13 वर्षे 5 महिन्यांची एक अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

मुलगी घरी परतलीच नाही

दरम्यान, सदर विद्यार्थीनी 7 जून रोजी सकाळी आपल्या घरातून शाळेसाठी बाहेर पडली होती, मात्र त्या दिवशी ती घरी परतलीच नाही. घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने हरवल्याची नोंद घेतली असून प्राथमिक चौकशीअंती अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

म्हार्दोळ पोलिसांकडून तपास सुरु

म्हार्दोळ पोलिसांनी मुलीच्या फोटोसोबत तपशील परिसरातील पोलिस ठाण्यांना पाठवून दिला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरु करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक योगेश सावंत यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, संबंधित विद्यार्थिनीबाबत (Student) कोणालाही काही माहिती मिळाल्यास म्हार्दोळ पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

परिसरात चिंतेचे वातावरण

दरम्यान, ही घटना संपूर्ण परिसरात चिंता आणि अस्वस्थता निर्माण करणारी ठरत असून, पोलिसांकडून विद्यार्थिनीचा लवकरात लवकर शोध लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT