Madhya Pradesh minor Goa Dainik Gomantak
गोवा

Madgaon Konkan Railway: मडगाव स्थानकावर आढळली मध्य प्रदेशातील अल्पवयीन, 19 वर्षीय तरुण ताब्यात; पोलीस तपास सुरु

minor girl found Madgaon: मध्य प्रदेश राज्यातील एक १५ वर्षीय मुलगी मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आढळल्याने खळबळ, सोबत असलेला तरुणाला कोकण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Akshata Chhatre

मडगाव: मध्य प्रदेश राज्यातील एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान तिच्यासोबत असलेला अजय चौधरी नावाच्या १९ वर्षीय तरुणाला कोकण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तसेच या अल्पवयीन मुलीला म्हापसा येथील ‘अपना घर’ या शासकीय देखरेख गृहात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून तेथील एक पथक गोव्यासाठी रवाना झाले आहे. हे पथक गोव्यात दाखल झाल्यावर या तरुणाला आणि मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.

कोकण रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.२७) कोकण रेल्वे पोलीस कर्मचारी मडगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गस्त घालत होते.

त्यावेळी त्यांना ही मुलगी एका मुलासोबत संशयास्पद अवस्थेत दिसली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन रेल्वे स्टेशनच्या कार्यालयात आणले. तिथे चौकशी केल्यानंतर परिस्थिती समोर आली.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या तरुणाची कसून चौकशी केली जात असून, त्याचे मुलीसोबत काय संबंध आहे आणि तो तिला गोव्यात का घेऊन आला, याचा पोलीस शोध घेत आहेत. मध्य प्रदेश पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झाल्यावर या प्रकरणाला अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

9 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा डाव

म्हापसा येथेल एका घराजवळ नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी खेळत असताना संशयित व्यक्तीने मुलीला काहीतरी आमिष दाखवून सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अल्पवयीन मुलीने जाण्यास नकार देत आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेताच संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून गोवा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करवून घेत तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT