Goa Crime News: पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आणि आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळ पोलिसांनी आज (29 जानेवारी) गोव्यात ही कारवाई केली.
धमकी देऊन अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप संशयित आरोपीवर आहे. अनेकवेळा त्याच्या अटकेसाठी प्रयत्न करण्यात आले मात्र, तो वेळोवेळी पोलिसांना चकवा देत होता.
आकाश जयस्वाल असे अटक आरोपीचे नाव आहे. आकाशचा गोव्यात पत्ता सापडल्यानंतर भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने विविध टीम तयार करुन सापळा रचला. सोमवारी त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाशने अल्पवयीन पीडितेला धमकावून तिला आठ वर्षांपूर्वी गोव्यातील अनेक हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दिल्ली, गोवा, सुरत, डेहराडून, मसुरी येथे पाठवले आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.
आकाशने मुलीच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीतून त्याच्यावर करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या जबानीच्या आधारे फरार आरोपी आकाशच्या वेगवेगळ्या ठिकाणांनप छापे टाकण्यात आले मात्र, वेळोवेळी तो फरार होण्यात यशस्वी झाला.
दरम्यान, गोव्यात आरोपीचे लोकेशन मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील अनेक हॉटेल्सवर छापे टाकून आकाश जयस्वाल याला अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.