Minor Kidnapped And Sexually Assaulted  Dainik Gomantak
गोवा

Minor Kidnapped And Sexually Assaulted: 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

दक्षिण गोव्यातील प्रकार; 30 वर्षीय युवकास अटक, दारुतून पाजले गुंगीचे औषध

गोमन्तक डिजिटल टीम

Minor Kidnapped And Sexually Assaulted: फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पोलिस शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच दक्षिण गोव्यात मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत शेजाऱ्यानेच एका 14 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 30 वर्षीय युवकाला अटक केली आहे. (Goa Crime)

मायणा कुडतरी पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 31 ऑक्टोबरच्या रात्रीला घडली. या घटनेतील पीडित संशयिताचा पूर्वीचा शेजारी असून त्याला तो मोटासायकलवरून रात्रीच्या वेळी एका निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने त्याला दारूतून गुंगीचे औषध पाजले. नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

भीतीमुळे त्या मुलाने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. मात्र नंतर त्याच्या गुदद्वारात दुखू लागल्याने त्याच्या आईने खोदून खोदून विचारल्यावर त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर काल रात्री उशिरा पोलीस स्थानकावर तक्रार नोंदविण्यात आल्यावर संशयिताला अटक करण्यात आली.

संशयित आरोपी व्यवसायाने मेकॅनिक असून बोर्डा येथे त्याची गाड्या दुरूस्त करण्याची गॅरेज आहे. संशयित यापूर्वी पीडित मुलाच्या शेजारी राहात होता. त्याच ओळखीचा गैरफायदा उठवीत त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT