Goa News: जाहिरातींबाबत आपची चौकशी सुरु

Goa News: सीबीआयचे छापे : खर्चाची माहिती घेण्यासाठी गोव्यात
advertisement inquiry aam aadmi party
advertisement inquiry aam aadmi partyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाच्या जाहिराती व त्यावरील खर्चाची माहिती घेण्यासाठी दिल्लीच्या सीबीआय पथकाने चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अनुषंगाने राज्यात पालिका व पंचायत संचालयनाच्या खात्यावर छापे टाकून फाईल्सची झाडाझडती घेतपालिका व पंचायत क्षेत्रात लावलेल्या जाहिरातींची माहिती जमा केली आहे.

सुत्रांनी सांगितले, की सीबीआय पथकाने गुरुवारी पालिका संचालनालयात तर आज दिवसभर पंचायत संचालनातही ही छापेमारी करत फाईल्सची तपासणी करत त्यातून माहिती घेतली आहे. कारवाईवेळी त्यांनी येथील स्थानिक सीबीआयची मदत घेतली नाही. हे पथक थेट दिल्लीहून गोव्यात दाखल झाले होते.

गुजरातमध्ये गढवी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

अहमदाबाद पत्रकार इसुदान गढवी हे आम आदमी पक्षाचे गुजरातमधील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्रिपदासाठी आपने सर्वेक्षण घेतले होते. यामध्ये जवळपास १६ लाख ४८ हजार लोकांनी सहभाग घेतला. यातील ७३ टक्के लोकांनी गढवी यांना पसंती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com