Hovercrafts  Google
गोवा

Pride for Goa: अभिमान! गोव्यातील कंपनीचा संरक्षण दलाशी करार; तटरक्षक दलासाठी पुरवणार अत्याधुनिक 'Hovercrafts'

Ministry of Defence India: संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी गोव्यातील चौगुले आणि कंपनी प्रा.लि.सोबत भारतीय तटरक्षक दलासाठी एकूण ३८७.४४ कोटी रुपयांच्या सहा एअर कुशन वाहनांच्या (ACV) खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Company to Supply Six Hovercrafts to Indian Coast Guard

पणजी: संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी गोव्यातील चौगुले आणि कंपनी प्रा.लि.सोबत भारतीय तटरक्षक दलासाठी एकूण ३८७.४४ कोटी रुपयांच्या सहा एअर कुशन वाहनांच्या (ACV) खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली. पाण्यावर तसेच जमिनीवर सरकणाऱ्या या नौका ज्यांना ‘हॉवरक्राफ्ट्स’ असे देखील म्हणतात, त्यांची खरेदी (भारतीय) या श्रेणी अंतर्गत केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेनुसार ही स्वदेशी बनावटीची एअर कुशन वाहने प्रथमच देशात तयार केली असून देशाच्या बांधणी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे तांत्रिक कौशल्य व स्वदेशी निर्मितीला सहाय्य मिळणार असून त्यामुळे सूक्ष्म लघु, मध्यम (एमएसएमई) क्षेत्राचा वैशिष्ट्यपूर्ण विकास साध्य होईल.

‘हॉवरक्राफ्ट्स’ची वैशिष्ट्ये

या खरेदीचे उद्दिष्ट भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेला चालना देत सागरी सुरक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित करणे हे आहे. अतिवेगवान किनारा गस्त (हायस्पीड कोस्टल पेट्रोलिंग), पूर्व टेहेळणी, शोध आणि बचावकार्य तसेच संकटात सापडलेल्या जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना मदत अशा बहुउद्देशीय सागरी क्षेत्रासाठी या आधुनिक वाहनांचा वापर केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माने टी-20 मध्ये रचला इतिहास, कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला; मॅक्सवेललाही पछाडलं

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

SCROLL FOR NEXT