Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: अधिवेशनाच्या कामकाजासाठी मंत्र्यांनी एक तास अगोदर यावे, वीजमंत्र्यांनी दिल्या सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic सध्या राजधानी पणजीत ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत तसेच जी-20 परिषद बैठकांच्‍या पूर्वतयारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे डांबरीकरण आणि इतर कामे सुरू आहेत.

वाहनचालकांना येजा करण्यासाठी अटल सेतू हा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. परंतु या पुलावर दोन्ही बाजूंनी डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

याच पार्श्वभूमीवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सर्व मंत्री, आमदारांउद्देशून एक सूचना केलीय. सध्या पणजीत होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे विधानसभेच्या कामकाजाच्या एक तास अगोदर सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.

ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून पर्वरी येथील सिग्नल सिस्टीम अधिक सुयोग्यरीत्या राबवण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

सध्या नव्या पाटो पुलावर डांबरीकरण सुरू आहे. तसेच अटल सेतूवरही दोन्ही बाजूला रस्‍ता डांबरीकरण करण्‍यात येत असल्‍याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अटल सेतू, दिवजा सर्कल, मांडवी पूल, पर्वरी सिग्नल आदी सर्वच ढिकाणी भर दुपारी उन्हाच्या झळा सहन करत तासन्‌तास वाहतूक कोंडीत लोक अडकून पडत आहेत.

 रात्री 10 नंतरही पणजी व पर्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे पणजीत येण्याऱ्या लोकांना आता दहावेळा विचार करूनच यावे लागेल असे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT