Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: वाहतूक कोंडीने मंत्री, आमदार धास्तावले

अनोखा उपाय : अधिवेशनाला उशीर होऊ नये म्हणून एक तास लवकर निघण्यावर चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

दुरुस्ती कामामुळे अटल सेतू वाहतुकीसाठी बंद आहे. तसेच पणजीतील खोदकामामुळे पर्वरी ते पणजी आणि मेरशी ते पणजी मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचा विषय आज मंत्रिमंडळासमोर चर्चेला आला. सोमवारपासून अधिवेशन सुरू होत असल्याने या कोंडीमुळे उशीर होऊ नये, याचा धसका मंत्र्यांनी घेतला आहे. त्याकरिता अधिवेशनासाठी एक तास आधीच निघण्यावर चर्चा झाली.

‘पर्वरीसह पणजीमध्ये मेगाब्लॉक होत आहे व त्याचा परिणाम म्हणून वाहनांच्या लांब रांगा पर्वरी ते पणजीपर्यंत लागत आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला वेळेवर पोहोचण्यासाठी मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांनी एक तास अगोदरच बाहेर पडण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

या कोंडीवर उपाय काढण्यासाठी लवकरच काही उपाययोजना काढण्यासंदर्भात पावले उचलण्याचे ठरले मंत्रिमंडळ बैठकीत ठरले’, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

राज्यात भूमिगत वीजवाहिन्यांचा 28 कोटी रुपयांच्या फोंडा येथील उपकेंद्रामधून कुंडई उपकेंद्रापर्यंतच्या प्रकल्पाचा प्रारंभ 26 रोजी पायाभरणीने सुरू केला जाईल. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर तेथूनच एक केबल माशेल - बाणास्तरीपर्यंत नेण्यात येईल. आवश्‍यकता भासल्यास ती पुढे नेली जाईल. त्यामुळे त्याचा फायदा औद्योगिक क्षेत्रात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार कमी होऊन उद्योगांना होईल, असे ढवळीकर यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT