Corona Update: कोरोनाचे नवे 55 बाधित; आठजण रुग्णालयात

आरोग्य यंत्रणा सतर्क ः एसओपीचे पालन करण्याचे इस्पितळांना आवाहन
Corona Virus |Goa
Corona Virus |GoaDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात ‘एच३एन२’ इन्फल्यूएन्झा विषाणूसह कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट तर 10 टक्क्यांच्या वर गेला असून नवे 55 बाधित सापडले.

गंभीर बाब म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून उपचारासाठी कुणालाही भरती करण्यात आले नव्हते. मात्र, आज एकाच दिवशी 8 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

आरोग्य खात्याने सांगितले, कोरोना संसर्गाचा फैलाव होत असून नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. वाढती रुग्णसंख्या हा गंभीर विषय त्यासाठी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळण्याचे सक्ती करण्यात आली आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १७८ इतकी आहे. आज घेतलेल्या 555 संशयितांच्या चाचण्यांपैकी 55 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Virus |Goa
Goa Corona Update: राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ; 'इतक्या' नवीन रूग्णांची भर

चाचण्यांचे प्रमाण वाढविले

नव्या बाधितांचे प्रमाण दुप्पट होत असल्याने आरोग्य विभागाने एक बैठक घेतली. संचालक डॉ. गीता काकोडकर, उपसंचालक आणि साथ रोग विभाग प्रमुख डॉ. सूर्यवंशी यांनी राज्यातील सर्व प्राथमिक, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांशी व्हर्चुअल संवाद साधत कोरोना संबंधीच्या एसओपीचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. याबरोबरच दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांच्या कोरोना चाचणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Corona Virus |Goa
Rahul Gandhi Disqualified: खासदारकी रद्द

राज्यात आज सापडलेल्या कोरोना बाधितांची संख्या अनपेक्षित आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या ही 8 आहे. यासाठी आता केवळ काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे. नागरिकांनी कोरोना संबंधित योग्य ती सतर्कता बाळगावी.

- डॉ. प्रशांत सूर्यवंशी, साथ रोग विभाग प्रमुख, आरोग्य खाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com