Dam Construction Canva
गोवा

Dams In Goa: गोव्याचा पाणीप्रश्न सुटणार, दोन धरणं बाधणार; जलस्रोत मंत्र्याची घोषणा

Subhash Shirodkar: राज्यात भरपूर पाऊस कोसळत असला तरी पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सध्या ३७४ बंधारे आहेत ते पुढील काळात पाचशेवर नेताना आणखी दोन नव्या धरणांचे बांधकाम हाती घेतले जाणार असल्याचे जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी जाहीर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

2 News Dams In Goa Says Subhash Shirodkar

फोंडा: राज्यात भरपूर पाऊस कोसळत असला तरी पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सध्या ३७४ बंधारे आहेत ते पुढील काळात पाचशेवर नेताना आणखी दोन नव्या धरणांचे बांधकाम हाती घेतले जाणार असल्याचे जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी जाहीर केले.

फोंडा ॲग्री बाजार संकुलातील सभागृहात ‘नारी शक्ती से जलशक्ती’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष शिरोडकर बोलत होते. हा कार्यक्रम जलस्रोत खात्यातर्फे आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आला होता.

यावेळी खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी तसेच संयुक्त मुख्य अभियंता अंकुश गावकर, ज्ञानेश्‍वर सालेलकर व जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप आदी उपस्थित होते.

संजना वेळीप म्हणाल्या की, पाण्याचे संवर्धन आज महत्त्वाचे ठरले असून पुढील पिढीला आपण योग्यरीतीने हा पाण्याचा स्रोत पोहोचवला पाहिजे. जलस्रोत खात्याने खूप चांगले उपक्रम आखले असून त्याला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

प्रमोद बदामी यांनी राज्यातील पाण्याची गरज आणि सद्यस्थिती यावर भाष्य केले. स्वागत व प्रास्ताविक अंकुश गावकर यांनी केले. त्यानंतर विविध मान्यवरांकडून पाण्यासंबंधीच्या विषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात संजय पाटील तसेच चंद्रकांत सामंत व प्रीती गावकर यांचा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जलसंवर्धनावर भर

सुभाष शिरोडकर म्हणाले की, जल हेच जीवन आहे. आपण पाण्याचा योग्य वापर केला तर पुढील काळात आपल्याला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते, म्हणून पाण्याचा व्यवस्थित वापर करताना हे पाणी पुढील पिढीसाठी राखून ठेवा.

केंद्र सरकारच्या अभियानानुसार गोव्यातही जलसंवर्धनावर जास्त भर देण्यात आला आहे. राज्यात भरपूर पाऊस होत असला तरी आपण सर्वजण या पाण्याबाबत गंभीर आहोत काय, याचा विचार करण्याची आज खरी गरज आहे.

पावसाच्या पाण्याच्या संवर्धनासाठी आता ३७४ बंधारे आहेत, ते ४७४ करण्यावर व नंतर हाच आकडा पाचशेपर्यंत नेऊन आणखी दोन नवीन धरणे बांधून पाण्याचे संवर्धन करण्याचा जलस्रोत खात्याचा मानस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हायरल होण्यासाठी काहीही? भर बाजारात तरूणीचा टॉवेलवर डान्स! नेटकरी भडकले

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

SCROLL FOR NEXT