Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa News : अंत्योदय तत्त्वा’नुसार कार्य; जनता दरबारात शंकांचे निरसन : फळदेसाई

पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबार या कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी काढले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : पिसुर्ले, भाजप सरकार हे अंत्योदय तत्त्वावर काम करीत असून त्यामुळे आज सरकारच्या विविध योजनांचा लाभ सर्व घटकांतील लोकांना होत आहे. जनता दरबारातून जनतेच्या समस्या त्वरित सोडविण्यात येत आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपले प्रश्न अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे उद्‍गार पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबार या कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी काढले.

आमदार डॉ. दिव्या राणे, समाज कल्याण खात्यांचे संचालक अजित पंचवाडकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, मामलेदार दशरथ गावस, पंच सगुण वाडकर, देवयानी गावस, राजेश्री काळे, विनोद शिंदे, नगराध्यक्ष शेयझीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार डॉ. राणे म्हणाल्या, सरकारने सुरू केलेल्या या जनता दरबारातून नागरिकांना थेट समस्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे.

प्रश्‍नांवर चर्चा

यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने सत्तरी तालुक्यात अटल आश्रय योजना, आल्वारा तसेच महसूल विभागाच्या जमिनीबाबत चर्चा झाली.

तसेच ओबीसी समाजाला प्रमाणपत्र घेण्यासाठी समस्या, अजूनपर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी सोपस्कर पूर्ण होत नाही, जलसंपदा खाते, पंचायतीना कचरा

निर्मूलन, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची कापणी व पावसाळ्यात धोकादायक झाडे कापण्यासाठी कमी पडत असलेला फंड सरकारने द्यावा, अशा विविध प्रकारच्या समस्या यावेळी लोकप्रतिनिधींनी उपस्थित केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT